वनिता सुदर्शन शेळके (वय ३३, रा. वाफे), लक्ष्मी दत्तात्रय पाटील (वय ५०, रा. चेरपोली), धीरज दत्तात्रय पाटील (वय १५, रा. चेरपोली) अशी तिन्ही मृतांची नावे आहेत. तिघेही सकाळी भातसा नदीवर गेले होते.
या दुर्घटनेत लक्ष्मी पाटील आणि धीरज पाटील या मायलेकरांना जलसमाधी मिळाली. तिघेही सकाळी कपडे धुण्यासाठी आणि अंघोळीसाठी नदीकाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही खोल पाण्यात गेले आणि बुडाले, अशी प्राथमिक माहिती आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच जीवरक्षक पथकाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम राबवत तिन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा पुढील तपास करत आहेत.
Location :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
April 09, 2025 3:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आईच्या कुशीत मुलगा-मायलेकरांना जलसमाधी, भातसा नदीत तिघे बुडाले, नेमकं काय घडलं?
