TRENDING:

Pune : 'मला भेटायला ये...', मुलीची फेक प्रोफाईल बनवली, 3 अल्पवयीन मुलांनी मर्डर केला, मृतदेह मुठा नदीत फेकला

Last Updated:

मुलीसोबत मैत्री केल्याच्या रागातून तीन अल्पवयीन मुलांनी तिसऱ्या अल्पवयीन मुलाला मुळा नदीत फेकून त्याची हत्या केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : मुलीसोबत मैत्री केल्याच्या रागातून तीन अल्पवयीन मुलांनी तिसऱ्या अल्पवयीन मुलाला मुळा नदीत फेकून त्याची हत्या केली आहे. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी 15 वर्षांच्या 3 मुलांना ताब्यात घेतलं आहे. पीडित मुलगा घरी न परतल्यामुळे मंगळवारी आईने तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
'मला भेटायला ये...', मुलीची फेक प्रोफाईल बनवली, 3 अल्पवयीन मुलांनी मर्डर केला, मृतदेह मुठा नदीत फेकला (AI Image)
'मला भेटायला ये...', मुलीची फेक प्रोफाईल बनवली, 3 अल्पवयीन मुलांनी मर्डर केला, मृतदेह मुठा नदीत फेकला (AI Image)
advertisement

मुलगा त्याच्या आईच्या फोनवरून त्याचं सोशल मीडिया अकाऊंट चालवत होता, त्यामुळे मुलाच्या भावाने त्याचं प्रोफाइल तपासलं, तेव्हा त्याला एका मुलीने पाठवलेला मेसेज दिसला, या मेसेजनंतरच मुलगा गायब झाला होता. कुटुंबाने ही माहिती पोलिसांना दिली.

हा मेसेज पाहून पोलिसांनी मुलीला शोधायला सुरूवात केली. मुलीने हा मेसेज मुलाला पाठवला नसल्याचं तपासात स्पष्ट झालं, त्यानंतर पोलिसांनी प्रोफाइल अॅक्टिव्हिटीची तपासणी केली, तेव्हा कुणीतरी मुलीचं नाव आणि फोटो वापरून फेक प्रोफाइल बनवल्याचं लक्षात आलं. मुलाला घराबाहेर काढण्यासाठीच हे फेक प्रोफाइल बनवल्याचा संशय पोलिसांना आला. या संशयावरून पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि 15 वर्षांच्या मुलाने ही प्रोफाइल बनवल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

advertisement

फेक प्रोफाइल बनवणाऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं, तेव्हा त्याने हत्येची कबुली दिली. मी माझ्या मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली आणि मृतदेह नदीत फेकून दिल्याचं अल्पवयीन आरोपीने पोलिसांना सांगितलं. अल्पवयीन मुलाच्या कबुलीनंतर पुणे पोलीस आणि अग्निशमन दलाने बुधवारी संध्याकाळी उशिरा मुठा नदीमध्ये शोध घेतला, पण अल्पवयीन मुलगा सापडला नाही.

कशावरून झाला वाद?

advertisement

संशयित आरोपी हा मुलीसोबत रिलेशनशीपमध्ये होता, पण पीडित आणि मुलगी यांची जवळीक वाढत असल्याचं त्याच्या लक्षात आल्यामुळे आरोपी नाराज झाला. आरोपी या मैत्रीच्या विरोधात होता, यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आरोपीने मुलासोबत संपर्क साधण्यासाठी फेक प्रोफाइल बनवली आणि त्याला भेटायला बोलावलं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात असं मंदिर तुम्ही पाहिलं नसेल! पर्यटकांचं ठरतंय नवं आकर्षण, हे आहे लोकेशन
सर्व पहा

डेक्कन परिसरातील मुठा नदीकाठच्या निर्जन ठिकाणी मुलगा आला, तेव्हा त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आणि मृतदेह मुठा नदीमध्ये फेकून देण्यात आला, अशी माहिती अलंकार पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांनी दिली आहे. आरोपी आणि मृत्यू झालेला मुलगा कोथरूडचे रहिवासी आहेत. आरोपीने शाळा सोडली होती आणि तो स्वतःचे पोट भरण्यासाठी छोटे मोठे काम करत होता.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune : 'मला भेटायला ये...', मुलीची फेक प्रोफाईल बनवली, 3 अल्पवयीन मुलांनी मर्डर केला, मृतदेह मुठा नदीत फेकला
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल