TRENDING:

मांजाने चिरला चिमुकल्याचा गळा, एका हाताने जखम दाबत गाठले रुग्णालय; 12 सेंटीमीटर खोल जखम

Last Updated:

धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरांमध्ये पतंगाच्या मांजाने एका चार वर्षाच्या मुलाचा गळा चिरला गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिपक बोरसे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

धुळे  : मकर संक्रांतीसाठी अजून काही दिवस बाकी आहेत, पण शहरात पतंगबाजीची लगबग सुरू होताच नायलॉन मांजाचे धोके पुन्हा समोर येऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांत या मांजामुळे गंभीर जखमी होण्याच्या घटना वाढल्या असून नागरिकांत चिंता वाढली आहे. धुळ्यात घडलेली एक घटना तर थरकाप उडवणारी ठरली आहे

धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरांमध्ये पतंगाच्या मांजाने एका चार वर्षाच्या मुलाचा गळा चिरला गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. कपिल पिंपळे असे या मुलाचं नाव असून तो आपल्या नातेवाईकांसोबत मोटर सायकलने जात असताना ही दुर्घटना घडली. मोटर सायकलवरून जात असताना अचानक मांजा रस्त्यात आडवा आला.   मोटर सायकलवर पुढे बसलेल्या कपिलच्या गळ्याला पतंगचा मांजा घुसला आणि जोरदार रक्तस्राव सुरू झाला. या मांजामुळे 12 सेंटीमीटर पर्यंत जखम झाल्याने तो गंभीर जखमी झाला.

advertisement

चिमुकलल्याला 15 टाके

दरम्यान जखमी झालेल्या कपिलवर धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कपिलचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आल आहे. कपिलचा गळा चिरला गेल्यानंतर खोलवर जखम झाली होती. दरम्यान डॉक्टरांनी तब्बल 14 ते 15 टाके घालत कपिलच्या गळ्यावरची शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे. सध्यस्थितीत कापिलची प्रकृती चांगली असून आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सयाजीराव भामरे यांनी दिली आहे.

advertisement

नायलॉन मांजावर कारवाई करण्याची मागणी

नायलॉन मांजावर बंदी असूनही हा मांजा खुलेआम दिसतो. आमच्या मुलासोबत जे घडलं, ते इतर कुणावरही येऊ नये. प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे. धुळे जिल्ह्यात पतंगच्या मांजामुळे झालेल्या या घटनेमुळे नायलॉन मांजाचा प्रश्न गंभीर बनला असून नायलॉन मांजावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

advertisement

चिनी आणि नॉयलॉन मांजाचा सर्रास वापर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Toyota ची धाकड MPV, 23 किमी मायलेज अन् सेफ्टीमध्ये टँकसारखी दणकट, किंमत किती?
सर्व पहा

संक्रात अवघ्या दोन दिवसावर आली आहे. अनेक ठिकाणी पतंग उडवायला सुरुवात झालीये. मात्र पतंग उडत असताना नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. त्यामुळे शहरात नागरिकांना चालताना किंवा वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन रस्त्याने जावे लागते. अनेक पक्षी, प्राणी, मनुष्य जखमी किंवा प्रसंगी मृत्यूमुखी पडतात. मांजावर बंदी घालण्याची सूचना न्यायलयाने सरकारला केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने 1986 पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5 नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी आहे. बंदी असूनही चिनी आणि नॉयलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असल्याचे या घटनांवरून स्पष्ट झाले आहे

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मांजाने चिरला चिमुकल्याचा गळा, एका हाताने जखम दाबत गाठले रुग्णालय; 12 सेंटीमीटर खोल जखम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल