शासनाने नुकतेच ई-बाईक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार विविध अटी-शर्तीचे पालन करणाऱ्या आणि केवळ इलेक्ट्रिक बाईक असलेल्या संस्थांना यापुढे बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व बाईक टॅक्सी या अनधिकृत आहेत.
खोटं नाव टाकून बाईक बुक केली, पोरगा १० मिनिटांत हजर, सरनाईकांनी रंगेहात पकडले!
या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला याबाबत विचारले असता, मुंबई अथवा इतर शहरांमध्ये कोणतीही अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप अस्तित्वात नाही, असे सरकारी उत्तर मिळाले. तथापि , त्याची उलट तपासणी करण्याच्या हेतूने मंत्री सरनाईक यांनी रॅपिडो बाईक टॅक्सी ॲप वर स्वतः अनोळखी नावाने बाईक बुक केली.
advertisement
पुढच्या दहा मिनिटांमध्ये सदर बाईक त्यांना घेऊन जाण्यासाठी मंत्रालयातील शहीद बाबू गेनू चौकामध्ये हजर झाली. अशाप्रकारे अनाधिकृतरित्या बाईक ॲप चालवणाऱ्या संस्थेचे भांडाफोड स्वतः परिवहन मंत्र्यांनी केला. आता, खुद्द मंत्री महोदयांना खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होईल? याची उत्सुकता लागून राहिली आहे.
वाहतूक व्यावसायिकांच्या समस्या निराकरणासाठी राज्य शासन सकारात्मक
मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार ई-चलन प्रक्रिया सुधारणासंदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न झाली. वाहतूक व्यावसायिकांच्या ई-चलन विषयक समस्यांचे निराकरण करण्याची शासनाची भूमिका असून त्यासाठी परिवहन विभागाने संबंधितांची समिती गठीत केली असून एका महिन्याच्या आत समितीने अहवाल सादर करावा, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीत दिले. यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव इक्बालसिंग चहल, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.