भाडेरचना आणि नियमावली
- ई-बाईक टॅक्सीच्या पहिल्या टप्प्यातील 1.5 किलोमीटरसाठी 15 रुपये भाडे आकारले जाईल. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी 10.20 रुपये शुल्क लागेल. हे दर राज्यभर एकसमान असतील, म्हणजेच मुंबई-पुण्यातील भाडेच सांगली-मिरजमध्ये लागू होईल.
- वाहन : या सेवेसाठी केवळ विजेवर चालणाऱ्या दुचाकींनाच परवानगी आहे.
- सुरक्षितता : महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चालक आणि महिला प्रवासी यांच्यात पार्टिशन असणे आवश्यक आहे.
- चालक पात्रता : चालकाचे वय 20 ते 50 वर्षे असावे. त्याला पोलीस तपासणी आणि वैध वाहन परवाना असणे अनिवार्य आहे.
- तांत्रिक सुविधा : प्रत्येक गाडीला जीपीएस ट्रॅकर आणि ॲप्लिकेशनची सुविधा असणे गरजेचे आहे.
- प्रवासी मर्यादा : 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या प्रवाशांना ई-बाईकवरून घेऊन जाण्यास परवानगी नाही.
advertisement
रिक्षाचालकांचा विरोध
या सेवेमुळे रिक्षा व्यवसायावर परिणाम होईल, अशी भीती रिक्षा संघटनांनी व्यक्त केली आहे. ऑटो रिक्षा महासंघाचे पदाधिकारी म्हणतात की, "व्यवसायातील अडचणींमुळे रिक्षाचालकांची उपासमार सुरू आहे. अशा परिस्थितीत ई-बाईक सेवा सुरू करून शासन रिक्षाचालकांना संकटात टाकत आहे."
advertisement
हे ही वाचा : नवरात्रीत कोल्हापूरला जाताय? फक्त अंबाबाईच नाही, तर 'ही' 7 प्राचीन मंदिरे तुमची यात्रा करतील पूर्ण, वाचा सर्व माहिती
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 1:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शासनाचा मोठा निर्णय! इस्लामपूर-सांगली-मिरजेत सुरू होणार 'ई-बाईक टॅक्सी सेवा', किती असणार भाडं?