चंदेल कुटुंबाने आज वडवणी पोलिसांची भेट घेतली, विनायक चंदेल यांचा मुलगा विश्वजीत चंदेल याच्या फिर्यादीवरून सदरील गुन्हा नोंदविला गेला आहे. सरकारी वकिलाने चक्क न्यायलयातच सत्काराच्या शालीने गळफास घेतल्यानं खळबळ उडाली आहे. विनायक यांना वारंवार त्रास दिला जात होता. त्यामुळेच, त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी चंदेल कुटुंबाने केली आहे.
advertisement
नेमकं काय लिहिलं सुसाईड नोटमध्ये?
या प्रकरणात विनायक चंदेल यांनी लिहिलेली सुसाईड नोट महत्त्वाची ठरली असून यामध्ये त्यांनी.. '' माननीय jmfc रफिक शेख हे माझ्या कोर्टामध्ये सर्वांसमोर अपमान करत असतात आणि माझे म्हणणे न ऐकता किंवा माझा विनंती अर्ज न स्वीकारता मनमानी आदेश पारित करतात. तायडे क्लर्क हे सर्व केसमध्ये सर्व साक्षीदारांना समन्स काढतात, माझे म्हणणे किंवा अर्ज न घेता व मला असहकार्य करतात. या दोघांच्या त्रासाला कंटाळून मला आत्महत्या करण्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही, याची चौकशी करून न्याय द्यावा ही विनंती ".. असे पत्र मुख्य न्यायाधीश साहेब उच्च न्यायालय मुंबई यांना लिहिले आहे.
दुसऱ्या चिठ्ठी मध्ये ईमेल अॅड्रेस नमूद करण्यात आलेले आहेत दरम्यान या सुसाईड नोटसह चंदेल यांच्या कुटुंबीयांनी देखील अशाच पद्धतीची तक्रार गेल्या काही दिवसापासून विनायक चंदेल हे करत होते असे सांगितले असून आता वडवणी पोलिसात रफिक शेख व तारडे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
