उद्धव ठाकरे म्हणाले, निष्ठेची मुखवटे लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला असतात त्यामुळे खरी माणसं ओळखताना आपली गल्लत होते. आनंद तरेंचं तेव्हा ऐकायला होतं आता मला या गोष्टीचा पश्चाताप होतोय. तेव्हा जर मी ऐकलं असतं तर दिल्लीत जाऊन हंबरडा फोडणारी आणि लोटांगण घालणारी माणसे आज दिसली नसती.
२०१४ साली काय म्हणाले होते अनंत तरे?
advertisement
२०१४ सालची निवडणुकीवेळी शिवसेना संपवण्याचा डाव होता. २०१४ साली सगळं ठरलं होती उद्या शेवटचं दिवस तेव्हा भाजपने युती तोडली मग लढायचं कस हा प्रश्न पडला होता. तेव्हा तरे साहेबांनी अपक्ष अर्ज भरला होता. तरे साहेब कोणाचही ऐकायला तयार नव्हते, त्यावेळी आत्ताचे लोटांगणवीर मातोश्रीवर आले आणि म्हणाले साहेब काही तरी कारा आपली सीट जाईल... मग मी तरेंशी बोललो त्यावेळी ते मला बोलले साहेब हाच आपल्याला उद्या दगा दिल्याशिवाय राहणार नाही. आज तेच झाले. तरेंसारखे राजहंस पुढे आले असते तर आज हे कावळे फडफडले नसते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आपण म्हैसासूरचा वध करु: उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेनेवर जशी संकटे आली तशी तरे कुटुंबावर अनेक संकटे आली पण ते शिवसेनेसोबत राहिले. बघू अजून कोण आपल्याला आडवं येतं त्यांना आडवे करून पुढे जाऊ.. आपली सर्व आयुधे काढून घेतली आहेत पण आईचा आशिर्वाद आपल्यासोबत आहे त्यामुळे आपण म्हैसासूरचा वध करु... ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्या शिवसेना आईचा घात केला त्यांना ही तसेच मिळेल.