बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा भ्रष्टाचाराचा आरोप समोर आला आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी बेस्ट पतसंस्था आणि बेस्ट कामगार सेनेवर थेट बोट ठेवत जवळपास 24 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आमदार लाड यांनी सरळसरळ उमेश सारंग (बेस्ट पतसंस्था) आणि सुहास सामंत (बेस्ट कामगार सेना) या दोघांना भ्रष्टाचारासाठी जबाबदार धरले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या दोघांनी सभासदांच्या पैशांचा स्वतःच्या चैनी आणि मौजमजेसाठी उधळपट्टी केली असल्याचा आरोप केला.
advertisement
>> कोणते आरोप आहेत?
> 6 कोटींचे बंगले तब्बल 24 कोटींना खरेदी करून स्वतःच्या फायद्यासाठी पैसे वळवले.
> 4 कोटींची कार्यालये अनावश्यक असूनसुद्धा 9 कोटींना खरेदी केली.
> वस्तू खरेदी-वाटपात मोठा अनियमित व्यवहार करून संस्थेचे प्रचंड नुकसान केले.
या घोटाळ्याबाबत पतसंस्थेचे सभासद घाग यांनी सहकार विभाग आणि इकोनॉमिक ऑफेन्सेस विंग (EOW) यांच्याकडे तक्रार केली आहे.
>> पोलीस चौकशी सुरू
या संपूर्ण प्रकरणात जवळपास 24 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली असून, सर्व 21 संचालकांची चौकशी व्हावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.