सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये जागावाटपावरून संभाव्य चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. विशेषतः, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्त्वपूर्ण आहे. महापालिका निवडणुकीत जागावाटपाची नेमकी रणनीती काय ठेवायची, यावर विचारविनिमय करण्यासाठीच ही बैठक झाली असल्याचे बोलले जात आहे. राज्यात सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलेला असताना ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची शक्यता निर्माण होणे, ही विरोधी पक्षांसाठी मोठी धोक्याची घंटा ठरू शकते.
advertisement
दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांशिवाय ही भेट होत आहे. दोन्ही भावांमध्ये जागावाटपावरुन संभाव्य चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे बंधूंची युती होणार असे संकेत दिसत असले तरीसुद्धा याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. असं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि आगामी निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे. या महत्त्वपूर्ण भेटीनंतर दोन्ही पक्षांचे पुढील पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
