TRENDING:

ठाकरे जिंकले तर मुंबईचा महापौर खान होईल, भाजपच्या टीकेवर अखेर १५ दिवसांनी उद्धव ठाकरेंचं रोखठोक उत्तर

Last Updated:

तुमच्या फडक्यवरचा हिरवा रंग काढा आणि मग आमच्या अंगावर या, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  महाराष्ट्रामध्ये पाच वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेय. मुंबई महापालिकेसाठी भाजप अन् ठाकरे पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. वरळी डोम येथे भाजपच्या कार्यक्रमात अमित साटम यांनी मुंबई महापौरावर वक्तव्य करत नव्या चर्चेला तोंड फोडलं होतं. मुंबईचा महापौर कोणत्या समाजाचा असेल, यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष साटम यांनी ठाकरेंकडे मुंबईची सत्ता गेली तर महापौर खान असेल असा टोला लगवला होता. त्यावर आज शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी रोखटोक उत्तर दिले आहे. अमित साटम यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
Uddhav Thackeray BMC
Uddhav Thackeray BMC
advertisement

उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई पालिकेची निवडणूक तुम्ही लावा, मुंबईच्या रस्त्याची चाळण झााली आहे. जरा कुठे पाऊस झाला तर मुंबई तुंबत आहे. मोनो रेल लटकत आहे, लोक खड्ड्यात जात आहे. बोटी का सुरू करत नााही? ही लोक भाजपचाचा महापौर झाला पाहिजे, असं सांगत आहे. ही लोक आता हिंदू -मुस्लमान वाद पेटवत आहे. धर्म आपल्या घरामध्ये ठेवा, माणुसकी हाच माझा धर्म आहे.

advertisement

उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

जे भाजपवाले अंगावर येत आहे, तुम्ही मुंबई जिंकली तर अदानीच्या पायावर समर्पण कराला, जाणवं घालाल. एक व्यापारी म्हणून तुम्ही मुंबईकडे पाहत आहात, आम्हाला हिंदूत्व शिकवू नका, पहिलं तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका. भगवा फक्त शिवसेनेच्या हातात आहे. तुमच्या फडक्यवरचा हिरवा रंग काढा आणि मग आमच्या अंगावर या, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

advertisement

काय म्हणाले होते अमित साटम?

उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई महापालिकेत सत्तेत आली तर 'खान' मुंबईचा महापौर होईल. ठाकरेंची शिवसेना खान महापौर करेल पण भाजप ते होऊ देणार नाही. मुंबईवर हिरवे संकट आले आहे. मुंबईचा रंग बदलण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाकरे जिंकले तर मुंबईचा महापौर खान होईल, भाजपच्या टीकेवर अखेर १५ दिवसांनी उद्धव ठाकरेंचं रोखठोक उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल