'इंडियाचा भारत करून टाकलं, तुम्ही एवढे घाबरलात? इंडियामध्ये आम्ही जुडेगा भारत, जितेगा इंडिया म्हणलं आहे. भारत पण आमचाच, इंडिया पण आमचाच आणि हिंदूस्तानपण आमचाच आहे. आम्ही त्याला भारतही म्हणू, इंडियाही म्हणू आणि हिंदूस्तानही म्हणू. नाव बदललं जातच नाहीये कारण भारत आहे, इंडिया आहे आणि हिंदूस्तानपण आहे, यावेळी आम्हीही बदल करणार आहोत. आम्ही तिथला सत्ताधारी पक्ष बदलणार आहोत. आम्ही पंतप्रधान बदलणार आहोत,' असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
advertisement
'भाजपला सोडलं पण मी हिंदुत्व सोडलं नाही आणि ते सोडूही शकत नाही. खरं हिंदुत्व काय आहे? शेतकरी अडचणीत असताना तिथे मुख्यमंत्र्यांना आणि आणखी कुणाला जायला वेळ नाही? ज्यावेळी तुम्ही शिवसेनेच्या नरडीला हात घातलात तेव्हाच मी ठरवलं यांचा राजकारणात पूर्ण निपात केल्याशिवाय राहायचं नाही. शिवसेना प्रमुखांनी हेही सांगितलं होतं की तुम्ही देश सांभाळा आम्ही महाराष्ट्र सांभाळतो, पण तुम्हाला देशही पाहिजे, महाराष्ट्रही पाहिजे, मुंबई पाहिजे, जळगाव पाहिजे. बाजार समित्या पाहिजेत, सोसायट्या पाहिजेत. जिकडे दिसेल तिकडे घुसेल,' अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली.
