उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा वचननामा जाहीर केला. हा वचननामा नागरिकांना क्युआर कोडद्वारे स्कॅन करून वाचता येणार आहे. या दरम्यान पत्रकारांनी ठाकरेंना अमित ठाकरेंना देण्यात येणाऱ्या छुप्या पाठिंब्याविषयी विचारले असता, ठाकरे म्हणाले, माहिममध्ये सभा घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही.माहिम हा मतदार संघ आमचाच आहे. असे म्हणत ठाकरेंनी मुळ उत्तर देणे टाळले आहे.त्यामुळे जरी ठाकरे उघडपणे बोलत नसले तरी त्यांचा छुपा पाठिंबा अमित ठाकरेंना असणार आहे.
advertisement
शिवाजी पार्कला १७ नोव्हेंबर सभा घेणार आहोत. आम्ही या सभेसाठी परवानगी मागितली आहे. तसेच हा दिवस शिवसेना प्रमुखांचा स्मरण दिन आहे. त्यामुळे लाखो शिवसैनिक तिथे येत असतात आणि यावर्षीही येणार.त्यामुळे निवडणुक आयोगाच्या आणि पोलिसांच्या आडमुठेपणामुळे संघर्ष होऊ देऊ नका.तुम्ही शिवसैनिकांना अडवू शकत नाही. त्यामुळे कुठेही संघर्षाची ठिणगी पडू नये यासाठी आम्ही जी सभेची मागणी केली आहे ती मान्य करावी, असे ठाकरे म्हणाले आहेत.
ठाकरेंच्या वचननाम्यातील प्रमुख मुद्दे
राज्यातील बेरोजगारी हटवणार
कोळीवाड्याला मान्य असेल असा विकास करणार
धारावीकरांना तिथेच घर देणार
मुलांनाही मोफत शिक्षण देणार
जीवनावश्यक भाव स्थिर ठेवणार
राज्यातील भूमिपुत्रांसाठी नोकऱ्या देणार
कोळीवाड्याचा क्लस्टर जीआर रद्द करणार
जुनी पेन्शन योजना लागू करणार
