TRENDING:

बोट कशी बुडाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं, उजनीच्या जलाशयात नेमकं काय घडलं

Last Updated:

मंगळवारी संध्याकाळी तुफान वादळी वारे सुटले होते. वारा कमी झाल्यावर पुन्हा बोटीकडे आलो तर बोटीत पाणी भरलं होतं. दोन ड्रम पाणी बाहेर काढलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुमित सोनवणे, प्रतिनिधी इंदापूर : उजनी जलाशयात अखेर 40 तासांनी शोधकार्य थांबवण्यात आलं. सहा जणांचे मृतदेह गुरुवारी सकाळी साडेअकारा वाजेपर्यंत मिळाले. बुधवारी संध्याकाळी 35 फूट खोल जलाशयात बोट सापडली. मंगळवारी संध्याकाळी उजनी जलाशयात वादळी वाऱ्यामुळे बोट उलटून धक्कादायक घटना घडली. यामध्ये सहा प्रवासी बुडाले. यात एक अख्खं कुटुंब गेलं. सर्वजण सोलापुरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
News18
News18
advertisement

एनडीआरएफने सर्व मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटली आहे. नेमकी ही दुर्घटना कशी घडली. बोट बुडाल्याचं कधी समजलं आणि उजनी जलाशयात घडलेली ही घटना कशी समोर आली हे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून अंगावर काटा येईल.

प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक अनुभव

मंगळवारी संध्याकाळी तुफान वादळी वारे सुटले होते. वारा कमी झाल्यावर पुन्हा बोटीकडे आलो तर बोटीत पाणी भरलं होतं. दोन ड्रम पाणी बाहेर काढलं. नाव मागे घेतली, तोवर दोघंजण आले होते. कुणीतरी मासेवाला जलाशयात वादळात सापडलाय आपण मदतीला जाऊया असं मी माझ्यासोबतच्या साथीदाराला म्हटलं.

advertisement

आम्ही त्या व्यक्तीला वाचवलं, त्याने गोल्या म्हटल्यावर आमच्या लक्षात आलं की काहीतरी घडलंय. आम्ही दोघांना कसंबसं वाचवलं. त्यादिवशी वादळी वारे खूप होते. 20 फुटाच्या अंतरावरचं काही दिसत नव्हतं अशी परिस्थिती होती. वारा जेव्हा कमी झाला तेव्हा आम्हाला ते दिसले नाहीतर त्यांचाही जीव वाचवता आला नसता.

साधारण ही घटना पावणे सहाच्या आसपास घडली असावी, प्रत्येकवेळी वारं सुटलं की आम्ही आमच्या होडीकडे येतो. उडी उडून जायची किंवा फुटायची भीती असते. त्यामुळे आमचं लक्ष असतं. त्यावेळी आम्ही आलो आणि दिसलं की माणूस पडलाय पाण्यात, ते जर दिसलं नसतं आणि १५ मिनिटं जरी उशीर झाला असता तरी तोही गेला असता असं दुसऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

गाळ्यात अडकल्यामुळे त्यांना बाहेर काढणं कठीण झालं. तिघांनी मिळून त्यांना बाहेर काढलं. तेही आम्ही ओढत नेलं, त्यानंतर खांदा लावला. ते पाणी प्यायले त्यानंतर त्यांना दोन तीन उलट्या झाल्या. त्यांना चांगलं वाटायला लागलं. त्यानंतर त्या व्यक्तीनं घडलेला प्रसंग सांगितला. वातावरणामुळे त्यावेळी आम्हाला तिथे जाणं शक्य झालं नाही.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बोट कशी बुडाली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं, उजनीच्या जलाशयात नेमकं काय घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल