सध्या जळगाव जिल्ह्यातून तीन खासदार संसदेत कार्यरत आहेत. त्यात खासदार रक्षा खडसे यांच्याकडे केंद्रीय युवक व क्रीडा राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. परंतु एकाच जिल्ह्यातून दोन मंत्र्यांची निवड ही केंद्र सरकारच्या समीकरणात बसत नाही. त्यामुळे उज्ज्वल निकम यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास रक्षा खडसे यांच्या सत्तास्थानाला हादरा बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
advertisement
लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांच्याविरुद्ध आक्रमक प्रचार करत निकम यांना तब्बल १६,५१४ मतांनी पराभूत केलं. परंतु राज्यसभेतून त्यांना संधी देत भाजपने निकम यांचं राजकीय पुनर्वसन केलं. आता पुढचा टप्पा मंत्रिपदाचा असू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. जर तसं झालं, तर जिल्ह्यातील सत्ता-संतुलनाच्या पटलावर मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. एका जिल्ह्यात दोन केंद्रीय मंत्रीपद भाजप देईल का? याबाबत शंका आहे. अशात उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवरील वर्णी म्हणजे भविष्यात त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी निश्चित असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. तर मोदी शहा यांची जोडी कायमच धक्कातंत्र देण्यात पटाईत असल्यामुळे रक्षा खडसे यांचे मंत्रीपद राहील किंवा ते त्यांना सोडावे लागेल? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
एडवोकेट उज्वल निकम यांची राज्यसभेमध्ये वर्णी लागल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना संधी दिली जाईल हीच स्वाभाविक गोष्ट आहे. भाजपने एस.जयशंकर यांचं उदाहरण तर पाहिलं त्यांना राज्यसभेवर घेऊन त्यांची विदेश मंत्री पदी वर्णी लावण्यात आली. हाच निकष उज्वल निकम यांच्याबाबत लागू होऊ शकतो कारण ते उज्वल निकम हे केवळ राज्य व देशापूर्ती मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची ख्याती आहे. त्यामुळे उज्वल निकम यांना कायदेमंत्री पद जर मिळालं तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखा नाही. त्यामुळे उज्वल निकम यांना मंत्रिमंडळात ताण मिळेल ही चर्चा चुकीची नाही. रक्षा खडसे याच्या माध्यमातून केंद्राचा एक प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात आहे. व तीन राज्याचे प्रतिनिधी मंत्रिमंडळात आहे . त्यामुळे राजकीय व भौगोलिक दृष्ट्या पाचवा मंत्रिपद जळगाव जिल्ह्यात देणे हा भाग जरी वेगळा असला तरी मात्र नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या धक्का तंत्राचा वापर झाल्यास काहीही होऊ शकतं असं मत राजकीय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. युवराज परदेशी यांनी व्यक्त केले आहे.
नरेंद्र मोदी हे करत धक्का तंत्रासाठी प्रसिद्ध आहेत. अद्याप पर्यंत त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा केलेला नाही. जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास उज्ज्वल निकम यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपने उज्ज्वल निकम यांना व्यापक चेहरा म्हणून राज्यसभेत घेतलं आहे. त्यांना फक्त जळगाव पुरतं मर्यादित करायचं असतं तर लोकसभा निवडणुकीत जळगाव ची जागा उज्ज्वल निकमांसाठी सेफ होती. त्यामुळे त्यांना भाजपने तिकीटही दिलं असतं आणि ते निवडूनही आले असते. मात्र उज्वल निकम यांची व्यापक पातळीवरून निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे उज्वल निकम यांची जर मंत्रिमंडळात वर्णी लागली तर रक्षा खडसे यांच्या मंत्रिपदावर गदा येईल, असं प्रथम दर्शनी वाटत नाही. मात्र खडसे आणि महाजन यांच्यातील वादामुळे रक्षा खडसे यांना फटका बसू शकतो अशी ही चर्चा सुरू असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील यांनी व्यक्त केली आहे.