निवडणूक निकालानुसार शिवसेनेच्या दोस्तीच्या गटबंधनाने सर्वाधिक 37 जागांवर विजय मिळवला आहे. त्यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाने 37 जागांवर यश संपादन केले आहे. वंचित विकास आघाडीला दोन जागांवर विजय मिळाला असून काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. या निकालामुळे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी दोन्ही प्रमुख गटांना इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. शिवसेनेच्या दोस्तीच्या गटबंधनाला किमान दोन अतिरिक्त जागांचा पाठिंबा हवा . बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आहे, तर भाजपला सत्तेसाठी 3 जागांची गरज भासणार आहे.
advertisement
छोट्या पक्षांची भूमिका आता निर्णायक ठरणार
वंचित विकास आघाडी आणि काँग्रेस या छोट्या पक्षांची भूमिका आता निर्णायक ठरणार आहे. शिवसेना- भाजपा या दोन्ही पक्षांकडे संख्याबळ आहे. त्यामुळे निवडून आलेले वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक, काँगेसचा 1 आणि अपक्ष 1 अशा नगरसेवकांचा भाव चांगलाच वधारला आहे. कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा, याबाबत त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
राजकीय हालचालींना वेग
निकालानंतर लगेचच राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांमध्ये चर्चा, बैठका आणि संपर्क सुरू झाले आहेत. उल्हासनगर महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार, याचा निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असून शहराच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
