केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२४ च्या लेखी आणि मुलाखतीच्या आधारे हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जानेवारी ते एप्रिल २०२५ दरम्यान मुलाखती घेण्यात आल्या.
या परीक्षेच्या निकालाच्या आधारे १००९ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय महसूल सेवा (IRS) अशा सेवांमधअये नियुक्त केले जाईल. संविधानाच्या नियम २० (४) आणि (५) नुसार, आयोगाने २३० उमेदवारांची राखीव यादी देखील प्रसिद्ध केली आहे
advertisement
UPSC नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी उमेदवारांना त्यांच्या रँक आणि उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या सेवा आणि केडर देण्यात येतील.
२०२४ च्या नागरी सेवा परीक्षेत टॉपर आलेले १० उमेदवार
१.शक्ती दुबे
२.हर्षिता गोयल
३. डोंगरे अर्चित पराग
४.शाह मार्गी चिराग
५.आकाश गर्ग
६.कोमल पूनिया
७.आयुषी बन्सल
८.राज कृष्ण झा
९.आदित्य विक्रम अग्रवाल
१०.मयंक त्रिपाठी