TRENDING:

Video: विधान भवनातल्या लॉबीत कुणी कुणाला मारलं? मारहाणीचा टॉप अँगल समोर

Last Updated:

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी नितीन देशमुख यांना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत तुंबळ हाणामारी झाली. आमदार आणि मंत्री ज्या प्रवेश द्वारातून विधान भवनात प्रवेश करतात त्याच द्वारासमोर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. ज्या विधान भवनात कायदे केले जातात, त्याच विधान भवनाच्या दारात कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली गेली.
विधान भवनात राडा
विधान भवनात राडा
advertisement

जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आली. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप आहे. गोपीचंद पडळकर यांच्याकडून यासंदर्भात दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घटनेची गंभीर दखल घेऊन विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करावी, अशी विनंती केली.

अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करून जितेंद्र आव्हाड बाहेर आले. त्याचवेळी लॉबीत असलेल्या नितीन देशमुख यांना गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे व्हिडीओत दिसते. जवळपास २ मिनिटे मारहाण सुरू होती. जिथून आमदार मंत्री विधान सभेत प्रवेश करतात, तिथेच ही मारहाण झाल्याने विधान भवनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

advertisement

नेमकं प्रकरण काय?

गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील वादाला आठवडाभराची पार्श्वभूमी आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांचा मंगळसूत्र चोर अशा उल्लेख केला होता. तर पडळकरांकडून आव्हाडांना अर्बन नक्सलची उपमा दिली गेली होती. काल विधान भवनाच्या द्वारात पुन्हा एकदा पडळकर आणि आव्हाड यांच्यात वाद झाला होता. कालच्या घटनेवेळी आव्हाड आणि पडळकर यांच्यासोबत जे लोक होते, तेच लोक आज पुन्हा समोर आले, तेव्हा नजरानजर होताच थेट मारहाणीला सुरुवात झाली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video: विधान भवनातल्या लॉबीत कुणी कुणाला मारलं? मारहाणीचा टॉप अँगल समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल