TRENDING:

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी तुमचे नाव चर्चेत! विनोद तावडे म्हणाले...

Last Updated:

केंद्राच्या राजकारणातील विनोद तावडे यांचे वाढते वजन पाहता ते भाजपचे महाराष्ट्रातील नवे मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा अनेकदा रंगते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढल्यानंतर आणि जिंकून आल्यावर आम्ही एकत्रित बसून चेहरा ठरवू, असे महायुतीचे नेते सांगत आहेत. दरम्यान, भाजपमधूनही मुख्यमंत्रिपदासाठी काही नावांची चर्चा माध्यमांमध्ये होत असते. यावरतीच ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी जोरदार फटकेबाजी केली.
विनोद तावडे (भाजप नेते)
विनोद तावडे (भाजप नेते)
advertisement

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या विनोद तावडे यांनी निवडणुकांच्या काळात विविध राज्यांचे प्रभारी म्हणूनही काम केले आहे. केंद्राच्या राजकारणातील विनोद तावडे यांचे वाढते वजन पाहता ते भाजपचे महाराष्ट्रातील नवे मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा अनेकदा रंगते. दिल्लीच्या राजकारणात राहून पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी जवळीक निर्माण केलेले विनोद तावडे यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये पाठवले जाईल, असे अनेकांकडून सांगितले जाते.

advertisement

तुमचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत! विनोद तावडे म्हणाले...

यावर विनोद तावडे म्हणाले, भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी ज्याचे नाव जास्तीत जास्त चर्चेत असते, तो कधीच मुख्यमंत्री होत नाही. भाजपने इतर राज्यात चर्चेत नसलेले अनेक नवखे मुख्यमंत्री दिले आहेत, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे निवडणुकीनंतर नेतृत्व निर्णय घेणार असल्याचे सूचित केले.

महायुती सरकारच्या योजनांचा तावडेंनी पाढा वाचला

advertisement

तावडे म्हणाले, विधानसभेच्या प्रचार सुरू झाला. महायुतीने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लोकांचा लाभ करून दिला आहे. मेट्रो, समृद्धी महामार्ग, अशा प्रकल्पातून पायाभूत विकास करण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना विजबील माफी, विद्यार्थ्यांना १० हजार लाभ, महिलांसाठी उज्ज्वला योजना, अशा लोकहिताच्या योजना महायुतीने राबविल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.

गेल्या १० वर्षांपासून केंद्रात मोदी सरकार, एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा डान्सबार मधून खंडणी घेतली. उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब लावले, याची आठवण आम्ही जनतेला करून देणार आहोत. १० वर्ष केंद्रात मोदी सरकार आहे. विरोधकांना एकही भ्रष्टाचाराचा आरोप करता आलेला नाही, असेही तावडे म्हणाले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी तुमचे नाव चर्चेत! विनोद तावडे म्हणाले...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल