विनोद तावडेंना सोडल्यानंतर हितेंद्र ठाकूरांनी माध्यमांशी संवाद साधला. हितेंद्र ठाकूर म्हणाले, आचरसंहितेमध्ये पत्रकार परिषद घेण्यास बंदी आहे असे म्हणत निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद थांबवली आहे. कोणत्या आचारसंहितेमध्ये पत्रकार परिषद घेण्याला बंदी असे लिहिले आहे. आता त्यांच्या अंगलट आले आहे काय बोलणार आता ते...
माझ्यावर नाही पण निवडणूक आयोग आणि पोलिसांवर दबाव: हितेंद्र ठाकूर
advertisement
तुमच्यावर कोणता दबाव आहे का? यावर बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले, माझ्यावर कोणताच प्रेशर नाही.. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. हॉटेलमध्ये माल खूप आहे. संपवा आणि मिटवा असे म्हणाले आपण मित्र आहेत... वेगवेगळ्या खोलीत पैसे आहे. मी कोणालाच घाबरत नाही. हा पण निवडणूक आयोग आणि पोलिस प्रशासनावर दबाव आहे. आरोप त्यांना झेपले नसते म्हणून त्यांनी पत्रकार परिषद थांबवली
विनोद तावडेंना 6 तास हॉटेलमध्येच रोखून धरलं
विनोद तावडे आणि ठाकूरांमधील राडा शांत करण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण विनोद तावडे होते त्याच्या शेजारील टेबलवर बविआ कार्यकर्त्यांच्या हातात काळ्या रंगाची बॅग लागली. त्या पाकिटातून नोटांची बंडलं बाहेर आल्यानंतर तर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना प्रश्न विचारत थेट 6 तास हॉटेलमध्येच रोखून धरलं होतं. त्यानंतर तावडे आणि ठाकूर हे एकाच गाडीतून निघाले.
