TRENDING:

विश्वास पाटील यांची ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड

Last Updated:

Vishwas Patil: ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात नियोजित आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने यंदाच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड केली आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.
विश्वास पाटील
विश्वास पाटील
advertisement

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात नियोजित असून साहित्यिक आणि मराठी वाङमय प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. विश्वास पाटील यांच्या 'पानिपत' या कादंबरीला मराठी वाचकांनी डोक्यावर घेतले.

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांच्याही नावांची चर्चा होती. मात्र महामंडळाच्या निवडकर्त्यांच्या सर्वांनुमते अखेर विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

advertisement

यंदाचे संमेलन साताऱ्यात पार पडणार असून, साहित्य महामंडळाचे कामकाज यापुढे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून पार पाडले जाणार आहे. पुढील तीन महत्त्वाची संमेलने—९९ वे, १०० वे आणि १०१ वे साहित्य संमेलनही याच काळात पार पडतील, अशी माहितीही देण्यात आली.

कोण आहेत विश्वास पाटील?

विश्वास पाटील हे ज्येष्ठ लेखक आहेत.

चंद्रमुखी, पांगिरा, पानिपत, क्रांतिसूर्य, झाडाझडती, लस्ट फॉर लालबाग, आंबी अशा कादंबऱ्या विश्वास पाटील यांनी लिहिल्या.

advertisement

विश्वास पाटील पानिपत ही कादंबरी विशेष गाजली. मराठी वाचकांनी पानिपत कादंबरी अगदी डोक्यावर घेतली.

त्यांनी सनदी अधिकारी म्हणूनही सेवा बजावली. एका सनदी अधिकारी म्हणून विश्वास पाटील यांनी मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये काम केले

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (SRA) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले

परंतु तेथील त्यांचे काम वादग्रस्त राहिले. निवृत्तीनंतर त्यांच्यावर एसआरए प्रकल्पांच्या मंजुऱ्यांमध्ये अनियमितता केल्याचा आरोप झाला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विश्वास पाटील यांची ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल