नेमकी घटना काय?
९ जानेवारी रोजी अजिंठा चौफुलीवरील बाबा बॅटरीसमोर ५८ वर्षीय भाऊसाहेब अभिमान पवार यांचा मृतदेह बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला हा आकस्मिक मृत्यू असल्याचा संशय होता. भाऊसाहेब पवार हे हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे. मात्र, एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला या मृत्यूबाबत संशय आल्याने त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली.
advertisement
सीसीटीव्हीने उघड केला खुनाचा थरार
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी हुसेन शेख अयुब शेख याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. घटनेच्या दिवशी आरोपी हुसेन आणि भाऊसाहेब पवार यांच्यात पैशांवरून वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हुसेनने पवार यांना खाली पाडून त्यांच्या छातीवर बसून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर गळा आवळून त्यांची हत्या केली.
एलसीबीची मोठी कारवाई
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत वेगाने हालचाली करत आरोपीला अटक केली आहे. "तपासात सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरला. आरोपीने पवार यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. पण पवार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी हुसेन याने थेट त्यांची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे," अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
