सुरेश धस म्हणाले, परळी नगरपालिकेचा स्पेशल ऑडिट करा यासाठी मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. आठ कोटी रुपयांचा आलिशान बंगला आकाने लातूरमध्ये बांधला आहे. आकाविषयी अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. बरेच प्रकरण बाहेर येतील. परळीच्या गायरान जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. दुसऱ्यांच्या जमिनीवर थेट ताबे घेतले आहे.वाळू, राखेवाल्यांवर मोक्का लावण्याची गरज आहे. ऑनलाईन सट्टा, ऑनलाईन मटका, खाजगी सावकारी बीड जिल्ह्यात अनेक गोष्टी आहेत. परळीत सगळ्या गुन्ह्याचे आणि माफियांच सिंडिकेट आहे. हे सिंडिकेट उद्ध्वस्त झाले पाहिजे.
advertisement
26 नाहीतर 226 अधिकारी आकाच्या दिमतीला
तृप्ती देसाई यांनी दिलेल्या 26 अधिकाऱ्यांच्या यादी पैकी दहा जण हे आकाचे तोंडही पाहिलेले नाहीत .त्यामुळे यादी देत असताना चुकीची यादी देऊ नये. आकाचे लोक फक्त 26 नाहीतर 226 असतील याची यादी गोळा करून राज्याच्या गृहमंत्र्याला देणार आहे. त्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर टाकावे.. आकाच्या दिमतीला कोणाला पाठवायचं अशी तयारी देखील केली जात होती, असे सुरेश धस म्हणाले.
संतोष देशमुखांचा पोस्ट मार्टम रिपोर्ट बरोबर
अंजली ताईंना मला सांगायचे जिल्हा शल्यचिकित्सक हा व्यक्ती अतिशय चांगला आहे. तो परदेशात आहे त्यांच्या पाठीमागे कोणी काम करत असेल मला माहित नाही संतोष देशमुखांचा पीएम रिपोर्ट बिलकुल छेडछाडीचा नाही अतिशय प्रॉपर तयार केलेला आहे. समजा अंजली दमानिया यांना काही आक्षेप असेल. देशमुख कुटुंबियांना पीएम रिपोर्टवर काही आक्षेप नाही. आठ पानांटा रिपोर्ट हा परफेक्ट पीएम रिपोर्ट आहे.. त्यांना दुमत असेल तर तो रिचेक करण्याची मागणी करावी. अशोक थोरात यांचा आणि माझा काही संबंध नाही मी कधी पत्रही दिले नाही पण त्यांच्या कामाचा रिपोर्ट चांगला आहे..