TRENDING:

साहेब माझे १० लाख परत द्या... तरुणाची विनंती, वाल्मिक कराडची जातीवाचक शिवीगाळ

Last Updated:

Walmik Karad: पैशाच्या व्यवहारातून वाल्मीक कराडने एका तरूणाला जातिवाचक शिवीगाळ केल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्या संदर्भात बीडच्या पाटोद्याचे युवा नेते विजयसिंह बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले आहेत. वाल्मीक कराड याला ९ डिसेंबर रोजी साडेपाच वाजताच सरपंच देशमुख यांची हत्या झालेली माहिती कशी मिळाली? असा सवाल बांगर यांनी उपस्थित केला. तर परळीमधील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणात देखील वाल्मीक कराड याचा हात असल्याचा आरोप बांगर यांनी केला.
वाल्मिक कराड
वाल्मिक कराड
advertisement

पैशाच्या व्यवहारातून वाल्मीक कराडने एका तरूणाला जातिवाचक शिवीगाळ केल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. आता सगळ्यांनाच मध्ये घेतो? तू कोण रे कुत्रा..? अशा प्रकरणाची भाषा वापरत जातीवाचक शिवीगाळ केली आहे. समोरच्या व्यक्तीने कामासाठी लाखो रुपये दिले होते. मात्र वाल्मीक कराड ते पैसे परत देत नसल्याने तरुणाने वारंवार फोन केल्याची माहिती आहे. याचाच वाल्मीक कराडला राग आला आणि त्याने थेट जातीवाचक शिवीगाळ केली. हीच कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.

advertisement

वाल्मिकला दिलेले पैसे मागितले तर जातीवरून शिवीगाळ

कराडच्या कॉल रेकॉर्डिंग संदर्भात विजयसिंह (बाळा) बांगर यांनी बोलताना सांगितले की, एका व्यक्तीने वाल्मीक कराडकडे कामासाठी दहा लाख रुपये दिले होते. ते दहा लाख रुपये वापस मागण्यासाठी संबंधित व्यक्तीने वाल्मीक कराडला फोन केला असता, पैसे परत करण्याऐवजी शिवीगाळ करून धमक्या दिल्या. वाल्मिकच्या दहशतीमुळे पीडित कुटुंबीय समोर यायलाही तयार नाही. सदरील प्रकार अत्यंत धक्कादायक असून बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून मी कॉल रेकॉर्डिंग देणार असल्याचे बांगर यांनी सांगितले.

advertisement

कराडने माझ्या कुटुंबालाही त्रास दिलाय

एवढेच नाही तर माझ्यासह माझ्या कुटुंबाला फार त्रास दिला. माझ्या आईला बीड पोलिसांनी पहाटे अटक केली. रुग्णालयात असताना तिला अंबाजोगाईला रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरू केली होती. अतिशय कठीण प्रसंगातून माझ्यासह अनेक कुटुंब गेली आहेत. हळूहळू मी त्याच्या संदर्भात खुलासे करणार असल्याचे बांगर म्हटले.

वाल्मिक कराड याला देशमुख यांच्या हत्येची आधीच माहिती

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अस्सल कोकणी मेवा, फक्त 50 रुपयांपासून चाखा चव, मुंबईत इथं आहे प्रसिद्ध स्टॉल
सर्व पहा

मी दिल्लीत असताना काही व्यक्ती मला ९ डिसेंबर रोजी भेटल्या. त्यांनी मला वाल्मिकला फोन लावून दिला. त्यावेळी काय नेते तुमचाच एक मित्र सरपंच परिषद खल्लास असे म्हणाला. वाल्मीक कराड याला साडेपाच वाजताच सरपंच देशमुख यांची हत्या झाली? हे कसे काय माहिती होते? असा प्रश्न बांगर यांनी विचारला. तसेच महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात देखील वाल्मीक कराडचाच हात असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
साहेब माझे १० लाख परत द्या... तरुणाची विनंती, वाल्मिक कराडची जातीवाचक शिवीगाळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल