TRENDING:

मोठी बातमी! वाल्मिकने दोषमुक्तीचे अपील मागे घेतला, चार्जशीट दाखल झाल्यानंतर अर्ज निष्फळ

Last Updated:

उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकदा दोषारोप निश्चित झाल्यानंतर दोषमुक्तीचा अर्ज निष्फळ ठरतो, असा युक्तिवाद शासनातर्फे करण्यात आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संदीपकुमार मोरे आणि न्या. आबासाहेब शिंदे यांनी वाल्मीक कराडच्या दोषमुक्तीच्या अपिलात हस्तक्षेपास नकार दिला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडने दोषमुक्तीचे अपील दाखल केले होते.
News18
News18
advertisement

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील दोषमुक्तीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वाल्मीक कराडने सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील दाखल केले होते. खंडपीठाचे न्या. संदीपकुमार मोरे व न्या. आबासाहेब शिंदे यांच्यासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा आधार घेत अपीलात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आला

खंडपीठाकडे यानंतर कराडच्या वकिलांनी अपील मागे घेण्याची विनंती केली. खंडपीठाने परवानगी दिल्यानंतर अपील मागे घेण्यात आले. खंडपीठाने याचिका निकाली काढली. वाल्मिक कराडने अंबाजोगाई सत्र न्यायालयात सादर केलेला दोषमुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आला होता. याविरोधात दाखल अपीलात शासनाच्या वतीने शपथपत्र दाखल  करण्यात आले.

advertisement

अपिलात दुरूस्ती अर्ज सादर करण्याची विनंती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात असं मंदिर तुम्ही पाहिलं नसेल! पर्यटकांचं ठरतंय नवं आकर्षण, हे आहे लोकेशन
सर्व पहा

अंबाजोगाई न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याने कराडने आपल्या अपिलात दुरूस्ती अर्ज सादर करण्याची विनंती केली. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकदा दोषारोप निश्चित झाल्यानंतर दोषमुक्तीचा अर्ज निष्फळ ठरतो, असा युक्तिवाद शासनातर्फे करण्यात आला. त्यामुळे वाल्मीक कराडचे अपील फेटाळण्यात यावे अशीही विनंती करण्यात आली.  वाल्मिक कराडच्या वतीने अॅड. नीलेश घाणेकर, तर शासनातर्फें मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंह गिरासे आणि  अॅड. पवन लखोटीया यांनी सुनावणीत काम पाहिले

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! वाल्मिकने दोषमुक्तीचे अपील मागे घेतला, चार्जशीट दाखल झाल्यानंतर अर्ज निष्फळ
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल