वर्ध्यातील पाच जण कौटुंबिक कार्यासाठी नागपूर येथे गेले होते. नागपूर येथून परत येत असताना वर्धेलगत ईव्हेन्ट मंगल कार्यालया जवळ कार वरील नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडर क्रॉस करून पलीकडच्या रस्त्यावर गेली. याच दरम्यान समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने कारला भीषण धडक दिली.हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे.
advertisement
या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक वृद्ध महिला व पुरुषाचा समावेश आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. या जखमींना तत्काळ स्थानिकांनी सावंगी मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर सध्या उपचार सूरू आहे. या अपघातातील मृत व्यक्ती आणि जखमी व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. पण यातील मृत आणि जखमी यापैकी कोणाचीच नावे समारे आली नाही आहेत.
दरम्यान या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.पोलिसांनी मृतांना शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत, तर जखमींवर उपचार सूरू आहे.या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला आहे की नाही, याची माहिती मिळू शकली नाही आहे. पण पोलिसांनी या घटनेचा कसून तपास सूरू केला आहे.