त्यामुळे वर्ध्याच्या ऑक्सिजन पार्कमध्ये जवळपास 21 हजार वृक्षांचा 23 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षाला राखी बांधून वृक्षाबंधन साजरे केले. वर्ध्यातील वृक्षपेमी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
VIDEO : गाव करी ते राव न करी, सामूहिक प्रयत्नातून झाली तलावाची जलपर्णीतून मुक्तता
झाडांना दिली वाढदिवसाची भेट
advertisement
वृक्ष बंधन साजरा करताना झाडांना भेट म्हणून विविध फुल झाडे भेट देण्यात आली. मागच्या वर्षी झाडांचा वर्धापन दिन साजरा करताना वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबाच्या रोपट्यांची भेट देण्यात आली होती आणि त्याची गुलाब बाग ऑक्सिजन पार्क परिसरात तयार झाली. यावर्षी वेगवेगळ्या जातीच्या फुलांचे रोपटे झाडांना भेट म्हणून देण्यात आले आहेत. त्याचीही या आठवणीत बाग तयार होणार आहे. ऑक्सीजन पार्कमध्ये राबविण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. एकीकडे ओसाड टेकडी असलेल्या या जागेवर निसर्गप्रेमींच्या पुढाकाराने पार्क तयार झाला आणि आज ऑक्सिजन पार्कमध्ये जवळजवळ एकवीस हजार झाडे आहेत.
OMG! करवंटीपासून बनवली बुलेट, अशा भन्नाट वस्तूंचा Video तुम्ही कधी पहिला नसेल
शालेय विद्यार्थी झाले सहभागी
शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे शिक्षक आणि इतर निसर्गप्रेमींनी परिसरात श्रमदान केलं. त्यानंतर ऑक्सीजन पार्कमध्ये मियावाकी पद्धतीने झाडं लावलेल्या परिसरात वेगवेगळ्या झाडांचं वृक्षारोपण केलं. वृक्षारोपण ही काळाची गरज आहेच मात्र वृक्ष संवर्धन होण्यासाठी वृक्षप्रेमींनी निसर्गप्रेमींनी अशा प्रकारे अभिनव उपक्रम राबवण्याची देखील महत्वाचं आहे.





