VIDEO : गाव करी ते राव न करी, सामूहिक प्रयत्नातून झाली तलावाची जलपर्णीतून मुक्तता

Last Updated:

ठाणे जिल्ह्यातला 'हा' तलाव गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे अखेर स्वच्छ झाला.

+
News18

News18

ठाणे, 8 सप्टेंबर : तलावांचं शहर अशी ठाण्याची ओळख आहे. शिलाहार राज्याची ठाणे ही राजधानी होती. त्यामुळे जवळपास साठपेक्षा जास्त तलाव इथं होते. त्यापैकी काही तलाव नामशेष झाले असून काही लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या 40 ते 42 तलाव शाबूत असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी देतात. यापैकी एका तलावाची नागरिकांनी एकत्र येऊन जलपर्णींच्या तावडीतून सुटका केलीय.
शीळ रस्त्यावरच्या देसाई गावातला तलाव नागरिकांनी स्वच्छ केलाय. हा तलाव जलपर्णीने भरलेला होता त्यामुळे तलावातील पाणी दिसेनासे झाले होते. आगरी समाज प्रतिष्ठान आणि डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यातर्फे हा तलाव साफ करण्यात आला. गावातली तरुण मुलं या मोहिमेत सहभागी झाली होती. जलपर्णी काढल्यानंतर त्वचेला प्रचंड वेदना होत असून औषधोपचार करावे लागले, अशी माहिती या तरूणांनी दिली.
advertisement
गावकऱ्यांच्या या प्रयत्नांमुळे पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन होत आहे. गावकऱ्यांनी उचललेल्या या पाऊलामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे तलावांचे जतन करण्यासाठी आणखी तरुण मुले पुढे सरसावतील आणि सर्वांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे.
advertisement
ठाणे महापालिका कचरा उचलत नसल्याचा आरोप गावकरी करत असून गेल्या आठवड्यात काढलेल्या जलपर्णीचा कचरा अद्यापही पालिकेने उचलला नाही अशी माहिती गावकरी देत आहेत. यासंदर्भात ठाणे महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तो होऊ शकला नाही.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
VIDEO : गाव करी ते राव न करी, सामूहिक प्रयत्नातून झाली तलावाची जलपर्णीतून मुक्तता
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement