OMG! करवंटीपासून बनवली बुलेट, अशा भन्नाट वस्तूंचा Video तुम्ही कधी पहिला नसेल

Last Updated:

नारळ विक्रेत्यानं करवंटीपासून वेगवेगळ्या भन्नाट वस्तू तयार केल्या आहेत.

+
News18

News18

डोंबिवली, 24 ऑगस्ट : बहुउपयोगी असणाऱ्या नारळाला 'कल्पवृक्ष' म्हणूनच ओळखलं जातं. आज जागतिक नारळ दिन साजरा होत आहे. आपण नारळाच्या अनेक वस्तू पाहिल्या असतील. पण एखादी कला उपजत अंगी असणं ही दैवी देणगी आहे. आवड असली की सवड मिळते ही म्हण कलाकारांना अगदी तंतोतंत लागू पडते. ते वेगवेगळ्या माध्यमातून आपली कला सर्वांसमोर मांडतात. डोंबिवलीजवळच्या ठाकुर्लीमध्ये राहणाऱ्या मोहन शेट्टी यांनी नारळाच्या कडक करवंटीपासून वेगवेगळ्या 90 वस्तू तयार केल्या आहेत.  त्यांच्या या वस्तू सर्वांचं आकर्षण ठरत असून अनेक जण या वस्तू पाहण्यासाठी त्यांच्या दुकानात येतात.
कशी सुचली कल्पना?
मोहन शेट्टी यांचा सुरुवातीपासूनच नारळ विक्रीचा व्यवसाय होता. नारळ विक्री करत असताना त्यांना काही वर्षांनी फुकट गेलेल्या नारळाच्या करवंटी पासून काहीतरी करावे असे वाटले. त्यानंतर त्यांनी घरातील हत्यार वापरून कलाकृती करण्यास सुरुवात केली . त्यांनी नारळाच्या करवंटीपासून स्वतः एक बाईक तयार केली. ही बाईक बनवायला त्यांना जवळपास 2 महिने लागले असे ते सांगतात.
advertisement
'मला शाळेत असल्यापासून चित्रं काढायला फार आवडत असे. मी दुकानात बसल्या बसल्याही स्केच काढत होतो. हे स्केच काढत असतानाच मला करवंटीपासून वस्तू बनवण्याची कल्पना सुचली. सुरुवातीला एक वस्तू बनवायला 2 ते 3 महिने लागत. आता हाताला सवय झाल्यानं वस्तू पटकन तयार होतात,' असं शेट्टी यांनी सांगितलं.
advertisement
नारळाची करवंटी ही खूप टणक असते. त्यामुळे तिला आकार देणे कठीण असते. आकार देत असताना किंवा तिला गुळगुळीत करताना अनेकदा हाताला लागले पण मी थांबलो नाही. दोन दिवस जखम बरी होईपर्यंत धीर धरतो त्यानंतर पुन्हा काम सुरू करतो.
advertisement
मी करवंटीपासून आत्तापर्यंत जवळपास 90 वस्तू बनवल्या आहेत. यामध्ये बजाजच्या जुन्या गाड्या, वेगवेगळे पक्षी, बेडूक, जास्वंदी फुल, सायकली, अननस झाड, डाव , गणपती, ट्रेन , समई, तंबोरा, विमान , बस दुकान सांभाळत मी हे काम करतो. अनेकदा रात्री दुकान बंद झाल्यानंतरही मी नाराळाला आकार देत असतो, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
या वस्तूंच्या खरेदीसाठी आजवर अनेकांनी तयारी दाखवलीय. पण, मला या कलेतून पैसे नको आहेत. आपल्या हातातून एक कला घडते याचंच समाधान मिळावं इतकीच माझी इच्छा आहे, असं शेट्टी यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
OMG! करवंटीपासून बनवली बुलेट, अशा भन्नाट वस्तूंचा Video तुम्ही कधी पहिला नसेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement