आदेश कुंडलिक चंदनखेडे असं या शेतकरी पुत्राचं नाव आहे. तो हिंगणघाट तालुक्यातल्या टेंभा या गावचा आहे. त्यानं जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं. शाळेपासून सैन्यात जाण्याचं त्याचं ध्येय होतो. त्याच्या या स्वप्नाला आई-वडिल, मामांसह प्रशिक्षकांनी देखील साथ दिली.
नवऱ्याच्या निधनानंतर हाती घेतलं स्टेअरिंग, पाहा कसा आहे पुण्यातल्या पहिला महिला ड्रायव्हरचा प्रवास
advertisement
आदेशचा हा प्रवास सहज झालेला नाही. यापूर्वी त्याला एकदा सैन्य भरतीच्या परीक्षेत अपयश आलं होतं. त्यानंतर पोलीस भरतीमध्ये तर फक्त एका मार्कानं त्याची संधी हुकली. या अपयशात मला मामांनी धीर दिला. त्यांनी प्रोत्सहान दिल्यानंच ही निवड झाल्याची भावना आदेशनं व्यक्त केली.
इंजिनिअर तरुणानं नोकरी सोडून सुरू केली लॉन्ड्री, आता करतोय लाखोंची कमाई
आदेशच्या या यशानं त्याच्या गावात आनंदाचं वातावरण आहे. गावकऱ्यांनी ट्रॅक्टरवरुन त्याची मिरवणूक काढत आदेशचा सत्कार केला. आदेशच्या या यशानं गावाचं नाव मोठं झालंय. मुलगा असावा तर असा अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केलीय.





