इंजिनिअर तरुणानं नोकरी सोडून सुरू केली लॉन्ड्री, आता करतोय लाखोंची कमाई
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मोठ्या पगाराची नोकरी सोडून कॉम्प्युटर इंजिनिअरने लॉन्ड्री सुरू केली. आता इतरांना रोजगार देत तो लाखोंची कमाई करतोय.
जालान, 21 सप्टेंबर: मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करत अनेकांना रोजगार देणाऱ्या तरुणांच्या यशोगाथा आपण ऐकल्या असतील. अशीच काहीशी कहाणी जालना जिल्ह्यातील कॉम्प्युटर इंजिनियर तरुणाची आहे. डॉ. होमी भाभा अॅटोमिक सेंटरमध्ये नोकरी करणाऱ्या अनिकेत अय्यर याने जालन्यात स्वत:चा लॉन्ड्री व्यवसाय सुरू केला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शहरातील हॉटेल्स, दवाखाने आणि इतर आस्थापनांचे कपडे धुवून प्रेस करून देण्याचं काम तो करतोय. यामधून काही लोकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.
नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय
हल्ली मनासारखी नोकरी मिळत नाही म्हणून तरुण निराश होतात. काही युवक तर नैराश्यात जातात. मात्र अनेक युवकांना रोजगार देणारा उद्योग अय्यर यांनी सुरू केला आहे. लाँड्री म्हटले की अनेकांना कपड्यांना इस्त्री करून देणे एवढेच ठाऊक असते. पण आज लाँड्री व्यवसाय अवाढव्य असा झाला आहे. अय्यर यांनी आधुनिकता स्वीकारात सहा ते सात मशीनद्वारे हा उद्योग सुरू केला आहे. हाताने कपडे न धुता मोठ्या आकारातील वॉशिंगमशीनच्या सहाय्याने कपड़े स्वच्छ धुतली जातात.
advertisement
आज शहरातील हॉटेल्स, हॉस्पिटल, ऑफिसेसमधील कपडे धुण्यासाठी अय्यर याच्याकडे आगावू नोंदणी करावी लागते. आज महिन्याकाठी साधारणपणे एक ते सव्वालाखांची उलाढाल होते. सर्व खर्च जाता चाळीस टक्के रक्कम उरत असल्याचे अनिकेतने सांगितले. विशेष म्हणजे सध्या तरी घरीच हा उद्योग सुरू केला आहे. भविष्यात औद्योगिक वसाहतीत जागा मिळाल्यास अत्याधुनिक असा कपडे धुण्याचा प्रकल्प उभारण्याचा मानस असल्याचे तरुण उद्योजक अनिकेत अय्यर याने सांगितले.
advertisement
प्रधानमंत्री रोजगार योजेतून मदत
लॉन्ड्री उद्योग उभारणीसाठी प्रधानमंत्री रोजगार योजनतून मोठी मदत झाली. महाराष्ट्र बँकेतून यासाठी साडेसहा लाख रूपयांचे कर्ज मिळाले. त्यातून सहा ते सात अत्याधुनिक वॉशिंग खरेदी केली. या उद्योगातून सहा ते सात जणांना रोजगार दिल्याचे समाधान असल्याचे अनिकेतने सांगितले.
advertisement
कपडे धुण्यासाठी आगावू नोंदणी
आनंदी लाॉन्ड्रीतून दर्जेदार सेवा दिली जाते. यामुळे शहरातील अनेक हॉस्पिटलमधील चादरी, अप्रॉन, गणवेश तसेच हॉटेल्समधील चादरी, बेडशीट, मोठ्या उद्योगातील गणवेश धुण्यासाठी आगावू नोंदणी करावी लागत आहे. मोठ्या लॉन्ड्रीमुळे मोठ्या प्रमाणात कपडे धुण्यासाठी येत असल्याचे अय्यर सांगतात.
कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा
view commentsलॉन्ड्री उद्योग सुरू करण्यासाठी माझी तयारी होतीच. पण सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या आई आनंदी अय्यर, वडील सुब्रमण्यम अय्यर आणि स्थापत्य अभियंता असलेली बहीण सुरश्री यांच्यासह मित्रपरिवार ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे हा उद्योग सुरू करू शकल्याची भावना अनिकेतने व्यक्त केली.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 21, 2023 10:17 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
इंजिनिअर तरुणानं नोकरी सोडून सुरू केली लॉन्ड्री, आता करतोय लाखोंची कमाई

