कंपाउंडर जनार्दन मामा झाले स्वातंत्र्य सैनिक, मराठवाडा मुक्ती संग्रामातील संघर्षगाथा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मराठवाडा मुक्ती संग्रामात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. यातीलच एक नाव म्हणजे जनार्दन मामा होय.
जालना, 17 सप्टेंबर: भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील देशातील हैद्राबाद संस्थान निजामाच्या ताब्यात होते. भारतात विलीन होण्यासाठी संस्थानातील जनतेने लढा उभारला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनेक लोक या लढ्यात सहभागी झाले. यापैकी एक म्हणजे जालन्यातील जनार्दन मामा. एका डॉक्टरांच्या हाताखाली कंपाउंडर म्हणून काम करणारे मामा या लढ्यात सहभागी झाले आणि एका चकमकीत त्यांना वीरमरण आले. त्यांच्या स्मृती जागृत रहव्या म्हणून जालना शहरातील मुख्य चौकात त्यांचा अर्धाकृती पुतळा आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामातील त्यांच्या योगदान विषयी जाणकार गणेश लाला चौधरी यांनी माहिती दिलीय.
चकमीत मामा शहीद झाले
जनार्दन मामा हे जालना शहरातील बडी सडकला असलेल्या डॉ. काळे यांच्याकडे कंपाउंडर म्हणून काम करायचे. निजाम सैन्य रजाकर यांच्याकडून जनतेचे छळ सुरू झाल्यानंतर त्यांनी देखील या लढ्यात सहभाग घेतला. टेंभुर्णी जवळीक पिंपळगाव इथे चकमकी दरम्यान त्यांना गोळी लागली. लोकांनी त्यांना देऊळगाव राजा इथे हलविले. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तिथेच त्यांचे अंत्य संस्कार करण्यात आले. मराठवाडा स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल जालना शहरातील नागरिकांनी मुख्य चौकात त्यांचा पुतळा उभारला. आजही या चौकाला मामा चौक असे नाव आहे. दवाखान्यात काम करता असताना डॉक्टरांची मुले त्यांना मामा म्हणायची म्हणून त्यांचे नाव मामा असं पडले असं गणेश लाला चौधरी सांगतात.
advertisement
रजाकारांच्या विरोधात लढा
निजाम शासक मिर उस्मान अली हा होता. त्याचा मुख्य सरदार कासिम रिजवी हा मूळचा लखनऊचा होता. त्याकाळी पदवीधर असलेला कासिम रिजवी आपल्या नातेवाईकांकडे लातूर इथे आला होता. इकडे आल्यानंतर त्याने निजाम सैन्य जॉईन केलं. कासिम रिजवि यानेच रजाकार फौज तयार केली. निजाम सैन्याचा सेनापती असलेल्या कासिम रिजवी याने रज्जकर यांच्या मदतीने जनतेवर अत्याचार सुरू केल्यानंतर अनेक लोकांनी याला प्रतिकार केला. यामध्ये राधा किशन लाला, खडसे इत्यादी लोकांनी पाच सहा लोकांच्या ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यामध्ये जनार्दन मामा हे देखील होते.
advertisement
मामांची कहाणी प्रेरणादायी
view commentsआपल्या मातृभूमीच्या रक्षणसाठी जनार्दन मामा यांच्यासह अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तब्बल एक वर्ष आणि एक महिना मराठवाड्यातील जनतेला उशीर स्वातंत्र्य मिळालं. जनतेमधून तयार झालेल्या क्रांतिकारकांनी ते निजामाच्या तावडीतून खेचून आणले. एका डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या कंपाउंडरने देखील या लढ्यात आपले योगदान दिले. मामांची ही कहाणी येणाऱ्या पिढ्यांना देखील प्रेरणादायी अशीच म्हणावी लागेल.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 17, 2023 8:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
कंपाउंडर जनार्दन मामा झाले स्वातंत्र्य सैनिक, मराठवाडा मुक्ती संग्रामातील संघर्षगाथा

