निजामशाही उखडून फेकणारे स्वामी रामानंद तीर्थ कसे होते? पुतण्यांनी सांगितल्या खास आठवणी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधीजींच्या इतकं मराठवाड्याच्या मुक्ती लढ्यात स्वामीजींचं योगदान आहे.
छत्रपती संभाजीनगर, 14 सप्टेंबर : आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण मागच्या वर्षी साजरा केला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. पण, आपल्या देशातील एक मोठा भाग तेव्हाही पारतंत्र्यात होता. सध्याचा मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकमधील काही भागावर निजामाचं राज्य होतं. निजामशाहीच्या राजवटीविरुद्ध संघर्ष करुन या भागातील नागरिकांनी स्वातंत्र्य मिळवलं. 17 सप्टेंबर 1948 या दिवशी हा भाग उर्वरीत देशामध्ये विलीन झाला.या लढ्याचं यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे.
स्वामी रामानंद तीर्थ हे मराठवाडा मुक्ती संग्रमाच्या लढ्याचे प्रमुख नेते होते. सन्यासी असलेल्या स्वामीजींनी अहिंसात्मक मार्गानं निजामाच्या विरुद्ध लढा उभारला. त्यांच्या या लढ्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये जागृती झाली. ते निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध पेटून उठले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधीजींच्या इतकं मराठवाड्याच्या मुक्ती लढ्यात स्वामीजींचं योगदान आहे.
advertisement
स्वामीजींच्या आठवणी
स्वामीजींचे पुतणे डॉक्टर शिरीष खेडगीकर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. व्यंकटेश भगवान खेडगीकर असं स्वामीजींचं पूर्ण नाव. कर्नाटकातील सिंदगीमध्ये त्यांचा जन्म झाला. 'स्वामीजी अंबेजोगाईध्ये योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये येत असतं. त्यावेळी मी स्वत: त्यांना डबा घेऊन जात असे. ते माझ्या अभ्यासाची आणि प्रगतीची चौकशी करत. स्वामीजींसोबत कायम वेगवेगळी पुस्तकं असतं. त्यांना सात भाषा येत होत्या. त्यांच्या प्रेरणेतूनच मी चौथीला स्कॉलरशिप परीक्षेत पहिला आलो होतो, अशी आठवण त्यांनी सांगितली.
advertisement
स्वामीजी माझ्या आईला माई म्हणतं. आईनं त्यांच्या प्रेरणेतून अंबेजोगाईमध्ये पहिली कन्या शाळा सुरू केली. स्वामीजींनी त्यांच्या लढ्याला कधीही धार्मिक वळण दिलं नाही. महात्मा गांधीजींच्या विचारांच्या आधारावरच त्यांनी हा लढा दिला.मी आज जो काही आहे तो त्यांच्या आशिर्वादामुळेच आहे, असं खेडगीकर यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
September 14, 2023 2:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
निजामशाही उखडून फेकणारे स्वामी रामानंद तीर्थ कसे होते? पुतण्यांनी सांगितल्या खास आठवणी

