आर्वी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दुचाकी चोरीच्या घटनाचा तपास आर्वी पोलिसांकडून सुरु होता. अशातच धानोडी येथे चोरीची दुचाकी विक्रीकरिता एक युवक येत असल्याची माहिती आर्वी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकला मिळाली. यावरून पोलिसांनी सपाळा रचत नयन मिलिंद गायकवाड वय 19 वर्ष राहणार - कोसूर्ला याला दुचाकीसह अटक केलीय. आरोपीला अटक करत तपास केला असता आरोपीने वर्धा जिल्ह्याच्या आर्वी, सेवाग्राम, सावंगी, अल्लीपूर, खरागणा, सेलू येथील दुचाकी चोरल्याची कबुली दिलीय. दुचाकी चोरताना आरोपी नयन सोबत वर्धेच्या येसंबा येथील साहिल डोंगरे व दोन अल्पवयीन मुले मदत करत होते. हे चोरटे दुचाकी चोरून वाशीम येथे जाऊन विक्री करत असल्याच समोर आलंय.
advertisement
वाचा - गेस्ट हाउसमध्ये प्रेयसीवर गोळीबार; स्वतःलाही संपवलं; धक्कादायक कारण समोर
आर्वी पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एकूण 23 दुचाकी जप्त केल्या आहे. या प्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खडेराव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, रामकिसन कासदेकर, दिगंबर रुईकर, अमर हजारे, प्रवीण सदावर्ते, राहुल देशमुख, निलेश करडे, स्वप्नील निकुरे यांनी केलीय.
