TRENDING:

Wardha News : वर्ध्यात राष्ट्रवादी, काँग्रेसला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Last Updated:

वर्ध्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, 28 नोव्हेंबर, नरेंद्र मते : वर्ध्यातून मोठी बातमी समोर येत आहे, वर्ध्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हिंगणघाटमधील शेकडो राष्ट्रवादी, काँग्रेसच्या कर्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हिंगणघाट मतदारसंघासोबतच सिंदी आणि समुद्रपूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमदार समीर कुणावार, अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री नितीन मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
News18
News18
advertisement

वर्ध्यातील हिंगणघाट येथे हा पक्षप्रवेश पार पडला. हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी आमदार समीर कुणावार, किशोर दिघे, नितीन मडावी यांची प्रमुख उपस्थिती होती. या पक्षप्रेवश सोहळ्याला भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्ये देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1854 पासूनची सर्व टपाल तिकीट, छ. संभाजीनगरमध्ये भरलंय प्रदर्शन, काय आहे खास?
सर्व पहा

दरम्यान पुढील काळात राज्यात विधानसभेसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
Wardha News : वर्ध्यात राष्ट्रवादी, काँग्रेसला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल