'त्या' तिघीनी घेतली उंच भरारी
समोर कितीही अडचणी असल्या तरी सदैव खंबीरपणे पाठीशी मैत्रीची साथ असते. याचाच प्रत्यय शिवानी आणि त्यांच्या दोन मैत्रिणींना आला. तृतीयपंथी समुदायांमध्ये शिक्षण क्षेत्रात फार कमी लोक पुढे जातात. शिक्षणात उंच भरारी घेत असताना अनेक सामाजिक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत न डगमगता या तीन मैत्रिणींनी आपापल्या क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचं श्रेय त्या आपल्या मैत्रीलाही देतात. तर मैत्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण शिवानी, रितू आणि वैशाली यांच्यातील मैत्रिबंध आहे.
advertisement
अशीही दोस्ती, मुक्या जीवांना लागला माणसाचा लळा, Video
निर्माण केली स्वत:ची ओळख
तृतीयपंथी समुदाय म्हंटलं की, शिक्षित व्यक्ती फार कमी असतात. टोलनाका, रेल्वे अशा ठिकाणी ही मंडळी टाळ्या वाजवून पैसे मागताना दिसतात. मात्र या तृतीयपंथी प्रमाणे आपण राहता कामा नये. आम्हाला शिक्षण घेऊन काहीतरी नाव मिळवायच आहे. असा ध्यास या तीन तृतीयपंथीनी घेतला आणि वैशाली आणि रितू ने शिवानीची साथ दिली. शिवानीने बी कॉम ते वकिली करून उच्च शिक्षण घेतलं आणि कोर्टात नोकरी करतेय. रितू ही एका हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहे तर वैशाली देखील बीएससी बीएड झाली असून स्पर्धा परीक्षेची तयारी करतेय. हे सर्व या तिघींच्या घट्ट त्रिबंधामुळे शक्य झालं आहे. शिवानी सुरकार या आपलं वकील बणण्यामागचा एक पाठीचा कणा आपल्या मैत्री असल्याचं सांगतात.