TRENDING:

वर्ध्यातील कताई विभागात कसं चालतं अंबर चरख्यावर काम? सूतकताई ते खादी पर्यंतचा प्रवास, पाहा Video

Last Updated:

चरख्यामुळे वर्धा जिल्ह्याला एक विशेष ओळख निर्माण झाली आहे. कताई विभागात सूतकताई ते खादी कापड तयार होण्यापर्यंतची नेमकी काय प्रक्रिया असते पाहा

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमिता शिंदे , प्रतिनिधी
advertisement

वर्धा, 28 डिसेंबर : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या चरख्यामुळे वर्धा जिल्ह्याला एक विशेष ओळख निर्माण झाली आहे. मगन संग्रहालयात सूतकताई कशी केली जाते? खादी कापड कसे तयार केले जाते? याबद्दल देशा विदेशातील पर्यटक वर्ध्याला भेटी देऊन माहिती जाणून घेत चरख्याला अभ्यासात असतात. महात्मा गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आजही ऑरगॅनिक कापसापासून मजबूत खादी कापड तयार केले जात आहे.

advertisement

महात्मा गांधीजींच्या काळात पूर्णपणे हातावर चालणाऱ्या अंबर चरख्याला कालांतराने सौरऊर्जेची जोड दिल्या गेल्याने आता त्याला सोलर चरखादेखील म्हंटलं जातं. वर्धा शहरातील मगन संग्रहालय येथे असलेल्या सूतकताई विभागात गांधीजींच्या अंबर म्हणजेच आताच्या सोलर चरख्यावर कशाप्रकारे काम होतंय? विशेषतः या विभागात सूतकताई ते खादी कापड तयार होण्यापर्यंतची नेमकी काय प्रक्रिया असते याबद्दल कताई विभागातील विभाताई रोटकर यांनी माहिती दिली आहे.

advertisement

मुक्या जीवांना जीवन, कोल्हापूरकरांनी उभारले कृत्रिम पाणवठे, Video

कताई विभागात अशी चालते प्रक्रिया?

सर्वात आधी ऑरगॅनिक कापूस खरेदी केला जातो. हिंगणघाट तालुक्यातील शेतकऱ्याकडून जास्त कापूस खरेदी होतो. जिनिंग मशीनमध्ये टाकून 67 टक्के सरकी तर 33 टक्के कापूस असा विभाजन केले जाते. त्या कापसापासून पुनी म्हणजेच रोविंग तयार केली जाते. ही सर्व प्रक्रिया रोविंग मशीनने केली जाते. आधी हाताने ही प्रक्रिया होत होती आता गेल्या 5-6 वर्षांपासून मगन संग्रहालय समितीकडून पुनी प्लांट गिरड येथे लावण्यात आला असून या प्लांटमधून हे रोविंग वर्धा मगन संग्रहालय सूतकताई विभागात आणल्या जाते, असं विभाताई रोटकर सांगतात.

advertisement

ऐतिहासिक किल्ल्यांवर द्या सरत्या वर्षाला निरोप, विदर्भातील हे किल्ले पाहाच!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
4 तासांचा कॅफे, नोकरी सांभाळत करतात व्यवसाय, दोन इंजिनिअर मित्रांची कहाणी, Video
सर्व पहा

त्यानंतर या रोविंगपासून सूत कताई केली जाते, कताई 30 अंकापासून 100 अंकांपर्यंत केली जाते. याठिकाणी अंक म्हणजेच धाग्याची कॅलिटी असते. धागा तयार झाल्यानंतर हँग्स तयार केले जातात. त्यानंतर रंगाई विभागात प्रक्रिया केली जाते. इथेही मशीनच्या माध्यमातून ही प्रक्रिया होते. त्यानंतर धाग्याला विणाईसाठी मजबुतीकरण करून तयार केले जाते. त्यापासून कोन तयार केले जातात. त्यानंतर वारपीन मशीन वर ताना तयार केला जातो. त्यानंतर आडवे आणि उभे ताने बाणे लावल्यानंतर हातमागावर कापड तयार होते ,असंही विभताई रोटकर यांनी सांगतात.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
वर्ध्यातील कताई विभागात कसं चालतं अंबर चरख्यावर काम? सूतकताई ते खादी पर्यंतचा प्रवास, पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल