याबाबत मिळालेली माहिती अशी की, वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील भिडी इथं एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने 23 वर्षीय तरुणीवर कैचीने सहा वार केले. या घटनेत तरुणी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संदीप मसराम असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. आरोपी हा जखमी तरुणीच्या गावातीलच असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी दिली.
advertisement
तरुणी ही आपल्या घरी एकटी होती. ती आपल्या अंगणात काम करत असताना त्याचवेळी आरोपी संदीप तिथे आला. त्याने तरुणीच्या गळ्यावर कैचीने वार केले. आरडाओरड झाली असता आरोपी संदीपने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी तरुणी ही रक्तबंबाळ स्थितीत पडून असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसून आले. त्यांनी लागलीच प्रसंगावधान राखत रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तर गावकऱ्यांनी तरुणाला पकडत चांगलाच चोप दिला.
