मेघे कुटुंबात फूट पडली?
वर्ध्यात भाजपाचे अभ्युदय मेघे यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अभ्युदय मेघे हे भाजप नेते तथा माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे आहेत. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते अभ्युदय यांचा काँग्रेसमध्ये कार्यक्रम पार पडला. वर्धा विधानसभा उमेदवारीकरिता अर्ज सादर केल्याची माहिती मिळत आहे. विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातुन अभ्युदय मेघे यांचा जिल्ह्यात चांगला जनसंपर्क आहे. अभ्युदय मेघे वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष देखील आहेत. अभ्युदय मेघे यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. उदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने कुटुंबात फुट पडल्याची चर्चा आहे.
advertisement
वाचा - 'कुणबी व्यक्तीला उमेदवारी..' त्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर भडकले; म्हणाले..
प्रवेशानंतर अभ्युदय मेघे म्हणाले, की पक्षात प्रवेश करण्याचं काही कारण नाही. सामाजिक कार्य करताना यापूर्वी कोणत्याही पक्षात प्रवेश घेतला नाही. आता जीवनाच्या वळणावर जे काम करत आहे, त्याला विस्तारित करावं यासाठी राजकारण हे चांगलं क्षेत्र आहे, त्यासाठी राजकीय प्रवेश केला. माणूस जेव्हा स्वतःच्या मनाचा विचार करतो. उदारमतवादी आणि गांधीजींच्या विचारावर पुढे नेणारा उदारमतवादी पक्ष काँग्रेस पक्ष वाटल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कुटुंबीय ज्या पक्षात आहे, त्याच पक्षात राहावे असं त्यांचं मत होतं. पण जेव्हा मी त्यांना सांगितले की माझा या विचारसरणीत मन नाही मानत. मी पदाचा राजीनामा दिला. पक्षामध्ये प्रवेश करताना विधानसभेकरीता उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला असल्याचेही त्यांनी सांगितले.
