Prakash Ambedkar : 'कुणबी व्यक्तीला उमेदवारी..' त्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर भडकले; म्हणाले..

Last Updated:

Prakash Ambedkar : विधानसभा उमेदवारीवरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी प्रश्न विचारताच ते भडकल्याचे पाहायला मिळाले.

News18
News18
नांदेड, (मुजीब शेख, प्रतिनिधी) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आली होती. नुकताच या यात्रेचा समारोप छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला. जरांगे पाटील यांना जेव्हा मी भेटलो तेव्हाही त्यांच्या मागणीला माझा पाठिंबा नव्हता आणि आजही नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न मंडल आयोगामध्ये आला होता. तेव्हा मराठा समाजातील जो वर्ग होता तो फरक करायला तयार नव्हता, असं आंबेडकरांनी सांगितलं. दरम्यान, आज नांदेड येथे कुणबी व्यक्तीला वंचितकडून उमेदवारी देणार नाही का? असा प्रश्न पत्रकाराने विचारताच प्रकाश आंबेडकर भडकल्याचे पाहायला मिळाले.
प्रकाश आंबेडकर त्या प्रश्नावर का भडकले?
कुणबी मराठा हे डबल भूमिका घेतात असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे केले होते. त्यावर वंचित बहुजन आघाडी कुणबी व्यक्तीला उमेदवारी देणार नाही का? असा प्रश्न पत्रकारांनी नांदेडमध्ये विचारला असता प्रकाश आंबेडकर चांगलेच भडकले. या प्रश्नावर उत्तर न देता हा प्रश्न तुम्हाला कोणी विचारायला सांगितला असे आंबेडकर म्हणाले. हा पेड प्रश्न असून इतरांना विचारा असे आंबेडकर म्हणाले. मी राजकारणातला बाप आहे, असे म्हणत प्रश्नाला उत्तर ने देता आंबेडकर निघून गेले.
advertisement
आरक्षणाची लढाई जिंकायची असेल, तर ओबीसींचे 100 आमदार निवडून आणा : आंबेडकर
आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे, त्याला राजकीय वळण लागू नये. यासाठी आम्ही आधीपासून प्रयत्न करत होतो. ही आरक्षण बचाव यात्रा जेव्हा नियोजित केली, ती पक्ष म्हणून नाही तर सामाजिक जबाबदारी म्हणून राहिली पाहिजे, त्याला राजकीय वळण देऊ नका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. संभाजीनगर येथील आरक्षण बचाव यात्रेच्या समारोप सभेत ते बोलत होते.
advertisement
आम्ही ज्यावेळी ही यात्रा काढली त्यावेळी बरीच नावे ठेवली गेली. मी गेली चाळीस वर्षे हे बघत आहे की, स्वतःला काय सुचत नाही म्हणून दुसऱ्यावर टीका केली जाते. यामध्ये आंबेडकरी चळवळीतील बांडगुळ पहिल्यांदा असतात हे लक्षात घ्या. कारण हे बांडगुळ जी आहेत ती पाकिटछाप बांडगुळ असल्याची टीकाही ॲड. आंबेडकरांनी या वेळी केली.
advertisement
वाचा - 'बिना भ्रष्टाचार, नहीं सहकार' राठोडांचा चंद्रकांत पाटलांसमोर सरकारला घरचा आहेर
ॲड. आंबेडकर म्हणाले की, आपल्याला इथून पुढे लढाई जिंकायची असेल, तर आपल्याला 100 ओबीसी आमदार निवडून आणावे लागतील. आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पक्षांनी भूमिका न घेतल्याने समाजानेच भूमिका घेतल्या आहेत. आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पक्षांनी भूमिका घेतली असती तर गावागावांतील समाजात फूट पडली नसती. मी खात्रीने सांगतो की, जरांगे पाटील यांनी जरी म्हटलं की, मी निवडणूक लढतो तरी हे राजकीयच भांडण असेल, सामाजिक होणार नाही. या आरक्षण बचाव यात्रेचे फलित काय असेल, तर छगन भुजबळ म्हणाल्याप्रमाणे 1977 ची परिस्थिती आणि शरद पवार म्हणाल्याप्रमाणे मणिपूरसारखी परिस्थिती इथे होऊ शकत नसल्याचेही आंबेडकर म्हणाले.
मराठी बातम्या/नांदेड/
Prakash Ambedkar : 'कुणबी व्यक्तीला उमेदवारी..' त्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकर भडकले; म्हणाले..
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement