वर्धा : आजच्या स्पर्धेच्या काळात महिला कुठेच कमी नाहीत. महिलाही आता 'चूल आणि मूल' यावर अवलंबून न राहता आता एसटी बसचे स्टेअरिंग हाती घेत आहेत. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे रब्बाना पठाण. रब्बाना पठाण यांनी लालपरीचं स्टेरिंग हातात घेतलं आहे. त्या वर्ध्याच्या आर्वी आगारात बस ड्राइव्हर म्हणून रूजू झाल्या आहेत. त्यामुळे आर्वी आगारातील पहिल्या महिला बस ड्राइव्हर म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवले आहे.
advertisement
कसा झाला प्रवास?
रब्बाना हयात खान पठाण या मूळच्या नांदेडच्या किनवट तालुक्यातील बोधडी (बुजुर्ग) येथील रहिवासी आहेत. रब्बाना यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केले आणि किनवट तालुक्यातून पदवीप्राप्त केली. घरात रब्बानाचे चारही भाऊ ड्रायव्हर आहेत. भावांना पाहून रब्बाना यांना ट्रक चालवन्याची इच्छा होती. आणि अनेकदा रब्बाना यांनी ट्रक चालून पाहिले. अशातच 2018 मध्ये एसटीमध्ये चालक कम वाहक म्हणून रब्बानाची निवड झाली. नागपूर ट्रेनिंग सेंटर येथे रब्बाना यांना एक वर्षाचे एसटी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि एसटी बसवर चाचणी घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन सेवेत आज रूजू करून घेण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत होतेय मेगा भरती, लगेच करा अर्ज
माझे 4 भाऊ आहेत, चौघेही ड्रायव्हर आहेत. त्यांना बघून मलाही मोठ्या गाड्या चालवण्याची इच्छा व्हायची. त्यामुळेच तेव्हा मी ट्रक चालवून बघायची मात्र तू हे खरंच करशील का? असं चॅलेंज भवांकडून दिलं जायचं. त्यामुळे मी 2016 पासून बस चालक बनण्यासाठी फॉर्म टाकले होते. त्यानंतर मला आता राज्य परिवहन महामंडळची बस चालवताना बघून ते कौतुक करताहेत. मला खूप आनंद होतोय की मी बस चालक म्हणून रूजू झालीय, अशा भावना राब्बाना यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्रातील 'या' महापालिकेत नोकरीची संधी, लगेच करा अर्ज
महाराष्ट्र राज्य परिवहनच्या सेवेत महिला चालक म्हूणन रब्बाना रूजू झाल्या असून नुकतेच त्यांनी आर्वी - अंबिकापूर आणि आर्वी- विरूळ मार्गावर एसटी बस चालवून नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. या महिलेची सर्व स्तरातून कौतुक केलं जातंय.