आमचं सरकार विधानसभेत येणारच आहे, सरकार आल्यावर पहिला देशद्रोहाचा गुन्हा वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यावर करणार आहे. त्याचं कारण सांगतो, सेवाग्राममध्ये विकास केल्यावर तेथील वास्तूची देखभाल - दुरुस्ती साठी एक व्यवस्था करून ठेवली होती, मी गेल्यावर ही व्यवस्थाच कलेक्टरने बंद केली. राष्ट्रपित्याबद्धल देखील अनादर आहे. याच्यावर तर गुन्हा दाखल करणार आहे. ज्या व्यक्तीच्या भरवशावर देश स्वतंत्र झाला, त्या संबंधी आपण आदर ठेऊ शकत नाही, प्रशासकीय अधिकारी आदर ठेऊ शकत नाही? कसले अधिकारी आहेत हे? देश स्वतंत्र झाला नसता तर हा अधिकारी आयएएस झाला असता का? हा देखील वखर घेऊन भर्र.. भुर्र करत शेतात गेला असता, असा टोलाही सुनिल केदार यांनी लगावला.
advertisement
वाचा - अजितदादांंच्या टीकेला कोल्हेंचं 3 प्रश्नांमध्ये उत्तर; शिरूरमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
बँक घोटाळ्यात सुनिल केदारांना जामीन मंजूर
काही दिवसांपूर्वी एनडीसीसी बँकेतील घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुनील केदार यांना न्यायालयानं दिलासा दिला आहे. सुनील केदार यांना एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सुनील केदार यांना 22 डिसेंबरला पाच वर्षांची शिक्षा तसेच 12.5 लाखांचा दंड ठोठावला होता. 28 डिसेंबरपासून सुनील केदार हे तुरुंगात होते. त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तीस डिसेंबरला जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आता केदार यांच्या वतीनं जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज केला होता. अखेर आज न्यायालयाने केदार यांना दिलासा आहे.
