याबाबत मिळालेली माहिती अशी की, हर्षल लंकेश्वर झाडे हा तरुण गोळीबारात जखमी झाला आहे. त्याच्यावर आयसीयूमध्ये उफचार सुरू आहेत. तर राहुल वाघमारे याला अटक करण्यात आलीय. जखमी हर्षल झाडे हा राहुलचा चुलत मामेभाऊ आहे. हर्षल आणि त्याची पत्नी स्नेहल हे भारतीय डाक विभागात काम करतात.
राहुलचं फेब्रुवारीमध्ये लग्न झालं होतं. त्या लग्नाला हर्षल उपस्थित नव्हता. त्याचाच राग मनात होता आणि त्यातून गोळ्या झाडल्या असा जबाब राहुलने पोलिसांना दिला. सोमवारी हर्षल घरी असताना आरोपी राहुलने त्याला बोलावून घेतलं. दोघे दुचाकीवरून निर्जनस्थळी गेले. तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि यावेळी राहुलने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या.
advertisement
गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी राहुलला काही तासातच अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आलंय. एकूण दहा काडतुसांपैकी तीन गोळ्या त्याने झाडल्या. न्यायालयाने त्याला २ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
हर्षल आणि त्याची पत्नी स्नेहल हे डाक विभागात काम करतात. तर त्याचा भाऊ दिल्लीला आहे. राहुल वाघमारे हा हर्षलच्या प्रगतीमुळे त्याचा तिरस्कार करत होता. त्यातूनच हर्षलवर हल्ला करण्याचा कट रचल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस आता यादृष्टीने तपास करत आहेत.
