कॉल करुन लोकांना गंडा
वर्ध्यातील रहिवासी प्रांजली दिनेश चुलपार (वय 19, रा. बोरगाव मेघे) हिने मोबाईलवर जॉब सर्च अपडेट नामक अॅप डाऊनलोड करुन त्यामधील फॉर्म भरला होता. 8 जून 2023 रोजी तिला अज्ञाताने फोन करुन तुम्ही एअर इंडियात नोकरीसाठी अर्ज भरला होता, त्यात तुमची निवड झाल्याचे सांगितले. प्रांजलीला विश्वासात घेऊन विविध मोबाईल क्रमांकावरुन फोन करीत फॉर्म भरण्यासाठी, जॉयनिंग लेटर, शुल्क भरावे लागतील असे सांगून 89 हजार 500 रुपये फोन पे वरुन विक्रम मल्होत्रा या आयडीवर भरण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने याबाबतची तक्रार सायबर पोलीस ठाण्यात दाखल केली.
advertisement
गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तात्काळ पथक तयार करुन सायबर पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तांत्रिक तपासानंतर हा गुन्हा फरिदाबाद हरियाणा व बदरपूर, साऊथ दिल्ली भागातून झाल्याचे प्रथमिक तपासात दिसून आले. पोलीस उपनिरीक्षक सिनूकुमार बानोत, कुलदीप टांकसाळे, निलेश तेलरांधे, अमीत शुक्ला, अनुप कावळे यांना दिल्ली येथे तपासाला पाठविले.
वाचा - हरदा नदीशेजारी सापडलेला 'तो' मृतदेह सना खानचा? DNA रिपोर्टमधून मोठा खुलासा
पोलिसांनी सतत सात दिवस शोध घेऊन अखेर साऊथ दिल्लीतील बदरपूर परिसरातील उच्चभ्रु परिसरात सुरु असलेल्या दोन बनावट कॉलसेंटरवर छापा मारुन दोघांना अटक केली. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. नागरिकांनी अशा बनावट कॉल्सपासून सावध राहावे, तरुण पिढीने सतर्क राहवे, जेणेकरुन फसवणूक होणरा नाही, असे आवाहन पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी केले.
