Sana Khan : हरदा नदीशेजारी सापडलेला 'तो' मृतदेह सना खानचा? DNA रिपोर्टमधून मोठा खुलासा

Last Updated:

नागपूर पोलिसांना मध्य प्रदेशात हरदा नदीशेजारी सापडलेला तो मृतदेह सना खान यांचा नसल्याचं समोर आलं आहे.

सना खान हत्या प्रकरण
सना खान हत्या प्रकरण
उदय तिमांडे 09 सप्टेंबर : भाजप अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना खान या दोन ऑगस्टपासून बेपत्ता होत्या, पण त्यांचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अमित शाहू याला अटक केली आहे. आरोपीने सना खान यांची हत्या केल्याची कबुली दिली, त्यानंतर पोलिसांकडून सना खान यांच्या मृतदेहाचा शोध सुरूच आहे. आता नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर पोलिसांना मध्य प्रदेशात हरदा नदीशेजारी सापडलेला तो मृतदेह सना खान यांचा नसल्याचं समोर आलं आहे.
डीएनए चाचणीच्या रिपोर्टवरुन तो मृतदेह सना खान यांचा नसल्याचं समोर आलं आहे. हरदा नदीशेजारी एका विहिरीत मिळता जुळता मृतदेह आढळला होता. पण तो मृतदेह सना खानचा नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. दोन ॲागस्टला भाजप पदाधिकारी सना खान यांची जबलपूर येथे हत्या झाली होती. या घटनेला 40 दिवस उलटूनही सना खानचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
advertisement
सना खान यांच्या हत्तेतील आरोपी अमित शाहू सेक्सटोर्शन रॅकेट चालवायचा, असं समोर आलं आहे. तो श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचा. मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेरीस या प्रकरणी आरोपी अमित शाहुला नागपूर पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी केली असताना त्याने सना खान यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितने पत्नी सना खानची हत्या ही पैशांच्या व्यवहारातून केली असल्याचं समोर येतंय. अमित साहूने पत्नीकडून 50 लाख रुपये इतकी रक्कम पार्टनरशिपसाठी घेतली होती. सनाने हे पैसे परत मागितले तेव्हा दोघांमध्ये वाद झाला.
view comments
मराठी बातम्या/नागपूर/
Sana Khan : हरदा नदीशेजारी सापडलेला 'तो' मृतदेह सना खानचा? DNA रिपोर्टमधून मोठा खुलासा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement