मिळालेल्या माहितीनुसार, स्वासीन गावातील अमोल जगताप आणि त्यांची पत्नी सीमा जगताप यांच्यात काल सायंकाळी वाद झाला. या वादानंतर पत्नी सीमा जगताप या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतातील विहिरीत जाऊन उडी मारली होती. पत्नीला विहिरीत उडी मारताना पाहून अमोल जगताप यांनी देखील तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. मात्र दोघा पती पत्नीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला होता.
advertisement
दरम्यान अमोल जगताप आणि त्यांची पत्नी सीमा जगताप घरून निघून गेल्याने गावकऱ्यांनी त्यांची शोधाशोध सूरू केली.यावेळी सीमा जगताप यांची चप्पल शेतातील विहिरी बाहेर दिसली होती.त्यानंतर त्यांनी विहिरीत सीमा जगताप आणि अमोल जगतापचा शोध घ्यायला सूरूवात केली. मात्र अंधार पडल्याने विहिरीतील शोध कार्य बंद करण्यात आले.त्यानंतर आज सकाळी पिंजरच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाने शोधकार्य सुरू केल्यानंतर त्या विहिरीतुन पती पत्नीचा मृतदेह शोधून वर काढण्यात आला.
पती पत्नी मधील किरकोळ वादातून विहिरीत बुडून पती आणि पत्नीच्या झालेल्या मृत्यू मुळे त्यांचा एक 15 वर्षाचा मुलगा तसेच एक 12 वर्षांची मुलगी पोरकी झाली आहेत.सवासीन गावात शोककळा पसरली आहे.तसेच या घटनेचा अधिक तपास मंगरुळपीर पोलीस करीत आहेत.
