TRENDING:

Amravati : पाणी प्यायल्या गेल्या अन् घात झाला, आश्रमशाळेत 14 वर्षीय विद्यार्थिनीचा जीव गेला, अमरावतीतील घटना

Last Updated:

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळेत ही घटना घडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती :  अमरावतीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  आदिवासी आश्रम शाळेत पाण्याची टाकी पडून एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये ३ विद्यार्थिनी जखमी झाल्या आहे. जखमी विद्यार्थिनींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील नागापूर येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळेत ही घटना घडली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.  सुमरती सोमा जामुनकर असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. दुपारच्या वेळी आश्रम शाळेतील विद्यार्थिनी पाणी पिण्यासाठी नेहमी प्रमाणे तिथे आल्या होत्या.

पण अचानक पाण्याची टाकीची भिंत कोसळली. टाकीच्या ढिगाराखाली सुमरती जामुनकर ही १४ वर्षांची विद्यार्थिनी सापडली. सुमरती जामुनकर सोबत आणखी तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या. आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थिनींना परत अचलपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. मात्र, उपचारपूर्वीच सुमरती जामुनकर या १४ वर्षी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

ही आश्रम शाळा भाजपचे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे यांचे असल्याचे माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आदिवासी विभागाचे कर्मचारी दाखल झाले.  अमरावती विभागाचे आदिवासी अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.  पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. मात्र, आदिवासी आश्रम शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवताशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ही आदिवासी आश्रम शाळा भाजपचे आमदार केवलराम काळे यांची असल्याने आदिवासी विभाग नेमकी काय कारवाई करते की हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार का ?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amravati : पाणी प्यायल्या गेल्या अन् घात झाला, आश्रमशाळेत 14 वर्षीय विद्यार्थिनीचा जीव गेला, अमरावतीतील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल