किनारपट्टीवर वादळ धडकत असताना, या भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि १०० किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहत होते. या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली, तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. प्रशासनाने वादळाचा फटका बसलेल्या तटीय आणि सखल भागातील नुकसानीचा आणि परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
हवामान तज्ज्ञ अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मध्य अरबी समुद्रा अजूनही डिप डिप्रेशन आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून आला आहे. मध्य महाराष्ट्रात पाऊस झाला आहे. दक्षिणेकडील राज्यांना याचा फटका बसला आहे. डिप डिप्रेशन गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज 29 ऑक्टोबर आहे. मोंथाच्या लॅण्डफॉलनंतर आज विदर्भात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वारे, 60 किमीपेक्षा जास्त स्पीड आणि मेघगर्जनेसह अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.
30 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मेघगर्जनेसह हा पाऊस होणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. तर 1 नोव्हेंबर रोजी हलक्या स्वरुपाचा पाऊस महाराष्ट्रात होईल. त्यानंतर हळूहळू पाऊस कमी होईल. खोल समुद्रात मच्छिमारांनी जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम बंगालच्या खाडीत 90 ते 110 किमी ताशी वेगाने सध्या वारे सुरू आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तवर जाऊ नये. अरबी समुद्रातही खोल समुद्रात डिप डिप्रेशनमुळे न जाण्याचा सल्ला दिला आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळनंतर लातूर शहरासह परिसरातील अनेक गावात तसेच निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ आणि औसा तालुक्यातील अनेक गावासह जिल्ह्यातील इतरही भागात जोरदार पाऊस बरसला. दिवाळी उलटून गेल्यानंतरही अद्याप पाऊस बरसत असल्याने रब्बी हंगामातील पेरण्या या आता लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मांजरा धरणाचे दोन दरवाजे 28 ऑक्टोबर रोजी उघडण्यात आल्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तेरणा नदीकाठच्या गावांनीही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
