TRENDING:

..तर तुम्हालाही सरकार देणार एकरकमी २०,००० रुपये, योजना आहे तरी काय?

Last Updated:

Government Shceme : दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील मुख्य कमावत्या सदस्याचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळते

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील मुख्य कमावत्या सदस्याचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेद्वारे पात्र कुटुंबांना तातडीची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थींना एकरकमी २० हजार रुपयांची मदत मिळते.
National Family Benefit Scheme
National Family Benefit Scheme
advertisement

गेल्या वर्षभरात राज्यातील अनेक गरजू कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला असून, संकटाच्या काळात ही मदत आधार ठरत असल्याचे दिसून आले आहे.

कोणाला मिळतो लाभ?

ही योजना National Social Assistance Programme अंतर्गत राबवली जाते. यामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील मुख्य कमावत्या स्त्री किंवा पुरुषाचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाते.

advertisement

मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती कोणताही असला तरीही कुटुंब पात्र ठरते. सर्व जाती-धर्मातील नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

अर्ज कुठे करायचा?

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज खालील ठिकाणी करता येतो जसे की, तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तलाठी कार्यालय

तसेच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करूनही सादर करता येतो.

advertisement

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतात.

मृत्यू प्रमाणपत्र

मृत व्यक्तीचे वय प्रमाणपत्र

तलाठी किंवा ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र (बीपीएल व मुख्य कमावता असल्याचे)

अर्जदाराचे आधारकार्ड

बँक खात्याचा तपशील

रहिवासी पुरावा

अर्जासाठी महत्त्वाची अट काय?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मृत्यूनंतर दोन वर्षांच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे. ठराविक कालावधीनंतर अर्ज केल्यास लाभ मिळत नाही.

advertisement

तातडीची आर्थिक मदत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रेडलाईट एरियातलं ‘ते’ दृश्य पाहिलं, केरळच्या लीला ईसोंना ठरवलं, नागपुरात मोठं काम, Video
सर्व पहा

या योजनेतून मिळणारी २० हजार रुपयांची एकरकमी मदत कुटुंबाला तात्काळ आर्थिक आधार देते. त्यामुळे अडचणीच्या काळात कुटुंबाचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका होतो.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
..तर तुम्हालाही सरकार देणार एकरकमी २०,००० रुपये, योजना आहे तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल