बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास जेलमध्ये वाद झाला. यावेळी जेल पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानं मोठा अनर्थ टळल्याचीही माहिती आहे. सरपंच हत्या प्रकरणात अटक असलेल्या परळीमधील आरोपींमध्ये हा वाद झाल्याने आता नव्या चर्चांना उधाण आलंय. परंतु वाल्मिकशी दोन हात करणारा बबन गितेचा कार्यकर्ता महादेव गिते कोण आहे, याची चर्चा सध्या सुरू आहे.
advertisement
वाल्मिक कराडला भिडलेला महादेव गित्ते कोण आहे?
-महादेव गित्ते हा बबन गित्ते याचा कट्टर कार्यकर्ता
-महादेव गित्ते हा बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी
-महादेव गित्ते सध्या बीड जिल्हा कारागृहात
-29 जून 2024 रोजी महादेव गित्तेवर गोळीबार
-कराडच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचा महादेव गित्तेचा आरोप
-महादेव गित्ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गित्तेचा कार्यकर्ता
-बापू आंधळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता
जेलमधील कर्मचारी वाल्मिक कराडला मदत करतात, महादेव गित्तेचा आरोप
जेलमधील गँगवॉरनंतर बीड पोलिसांनी महादेव गितेसह चौघांना हर्सूल कारागृहात नेले. बीडमधून घेऊन जात असताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर महादेव गित्तेने धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच जेल कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याची मागणी केली आहे. जेल पोलीस वाल्मिक कराड याला मदत करत आहेत. जेलरही त्याला मदत करत आहेत. त्याने १० दिवसांपूर्वी आम्हाला मारण्याचा प्लॅन जेलरच्या केबिनमध्ये बसून केला होता, असा आरोपही महादेव गितेने केला.
