मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी राज्यातील घडामोडीवर त्यांनी भाष्य केलं. राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, याबद्दल प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले की, "कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही सरकार म्हणून भाजप पक्ष म्हणून उभे राहू. अजित दादाचा कुटुंब असो किंवा राष्ट्रवादीचे पक्ष असेल. त्याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांच्या निर्णयाला आमचं समर्थन असेल' असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
advertisement
तसंच, 'राष्ट्रवादीचे नेते माझ्याशी २ वेळा चर्चा करून गेलेले आहे. त्यांची कार्यपद्धती आणि काय पर्याय आहे ते त्यांनी संदर्भात चर्चा केली. अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल. त्या संदर्भात मी बोलणे योग्य होणार नाही' असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
अर्थसंकल्प कोण सादर करणार?
'आता तरी असं आहे की, अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती. उद्यापासून मी स्वत: अर्थसंकल्पाच्या जी काही प्रक्रिया आहे, त्यात लक्ष घालून जी काही प्रक्रिया आहे, ते पूर्ण करेल. त्यानंतर आम्ही अर्थसंकल्प कोण सादर करणार हे ठरवू आम्ही एकत्रपणे ठरवू.' असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
नागपूर महापौर कोण होणार?
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आमचे नेते आणि मार्गदर्शक आहे. महापौरच्या निवडणुका संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. त्या अनुषंगाने रूपरेषा ठरवण्यात आली आहे. जे काही नाव आहे त्या नावाच्या अनुषंगाने निर्णय उद्या किंवा परवा घेतले जातील. ठरल्याप्रमाणे रूपरेषेनुसारच नाव अंतिम होतील. शहरअध्यक्ष आमदार हे निर्णय घेतील' असंही फडणवीस यांनी सांगितलं.
